शिरपूरचा संमेक जगताप याची धुळे जिल्हयाकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षेआतील संभाव्य संघात निवड



शिरपूर  : शिरपूरचा संमेक जगताप याची धुळे जिल्हयाकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १९ वर्षेआतील संभाव्य संघात निवड झाली असून त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

शिरपूरच्या संमेक जगताप हया क्रिकेटपटूची धुळे जिल्ह्याकडून एकमेव खेळाडू पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या १९ वर्षेआतील मुलांच्या निवड शिबिरासाठी पुणे येथे रवाना झाला आहे. 

सदर शिबिरात मागील वर्षी १९ वर्षे आतील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तीस खेळाडूंना पुणे येथील सहारा आंतरराष्ट्रीय मैदानावर शिबिरासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर शिबिर २५ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२१ पर्यत होणार असून त्यात फिटनेस, स्पर्धात्मक सामने होऊन खेळाडूंची निवड केली जाणार आहे. संमेक जगताप याने मागील वर्षी आपल्या उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजीचा बळावर ही संधी मिळवली आहे. यापूर्वी त्याने सतत तीन वर्षे अनुक्रमे १४ व १६ वर्षे आतील वयोगटात महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. या कालावधीत त्याने उत्तर महाराष्ट्राचे कर्णधारपद देखील भूषविले आहे. मागील सहा वर्षापासून शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन शिरपूर येथे तो क्रिकेट खेळाचे व्यावसायिक प्रशिक्षण घेत असून आर. सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय शिरपूरचा माजी विद्यार्थी आहे. संमेक हा एक उत्कृष्ट अष्टपैलू क्रिकेट खेळाडू आहे व भविष्यात त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर वरील संघात खेळण्याच्या अपेक्षा तज्ञांकडून वर्तविले जात आहे.
संमेक हा महसूल  मंडळ अधिकारी संजय भाऊराव जगताप यांचा लहान चिरंजीव असून क्रिकेट प्रशिक्षक राकेश बोरसे, संदीप देशमुख, कुणाल गिरासे, चेतस्वीनी राजपूत हे त्याला  मार्गदर्शन करीत आहेत.


संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापक रवि बेलाडकर, क्रीडाशिक्षक डी. बी. पाटील, अनुप चंडेल, प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रशिक्षक यांनी त्याला शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने