शिरपूर : वैराग जि. सोलापूर या ठिकाणी गॅपलिंग कमिटी ऑफ महाराष्ट्र आणि गॅपलिंग कमिटी ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिली राज्यस्तरीय गॅपलिंग कुस्ती स्पर्धा संपन्न झाली.
शिरपूर येथील राकेश गोकुळ खरे (आर. सी. पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर) व अनुराग रवींद्र कोळी यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. तसेच देवेंद्र पाटील, प्रेम कढरे, रोहित माळी (आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर) या तीनही खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळवून रोप्यपदक मिळविले. या खेळाडूंची दिल्ली या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय निवड झाली आहे. प्रीतम कढरे (आर. सी पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर), मनीष मंजिरे यांनी तृतीय क्रमांक मिळवून कास्य पदक मिळवले. सदर खेळाडूंना कुस्ती प्रशिक्षक कन्हैयालाल माळी त्याच प्रमाणे तालुक्यातील ज्येष्ठ कुस्तीगीर एस. एच. निकुंभे, क्रीडा समन्वयक राकेश बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, मुख्य वित्त अधिकारी नाटूसिंह गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ. उमेश शर्मा, मुख्याध्यापक पी. व्ही. पाटील, क्रीडाशिक्षक एम. एस. पाटील, बी. डी. पाटील व क्रीडा प्रशिक्षक यांनी कौतुक केले.
Tags
news
