राष्ट्रीय पोषण माहनिमित्त उद्यापासून धुळे जिल्ह्यात विविध कार्यक्रम




धुळे, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त 1 ते 30 सप्टेंबर 2021 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभिसरण समितीचे सदस्य सचिव संजय बागूल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये दिली आहे. 
राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येतील. याशिवाय अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे शंभर टक्के कोविड- 19 लसीकरण, अंगणवाड्यांना शंभर टक्के पाणीपुरवठा, गर्भवतींची तपासणी व संवाद, ‘माझे मूल- माझी जबाबदारी’, कोविड- 19 ची लक्षणे असलेल्या बालकांची तपासणी व उपचार, गृहभेटीच्या माध्यमातून गर्भवतींना आहार विषयी समुपदेशन व आयएफए गोळ्यांच्या सेवनाचे निरीक्षण, सॅम बालकांची तपासणी व उपचार, ऑनलाइन पूर्व शालेय शिक्षणाचे कृती कार्यक्रम, तरंग सुपोषितद्वारे जनजागृती व नोंदणी, समाजमाध्यमांद्वारे प्रचार व प्रसिध्दी, तिसऱ्या खेपेच्या मातांसठी एका तासाच्या आत स्तनपानाबाबत समुपदेशन, पहिल्या व दुसऱ्या खेपेच्या मातांसाठी आहाराबाबत समुपदेशन, ‘माविम’च्या माध्यमातून कार्यशाळा, उत्कृष्ट कामगिरी बजावणारे बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांचा सन्मान सोहळा जिल्हा, प्रकल्प, बीट व अंगणवाडीस्तरावर होईल, असेही उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बागूल यांनी म्हटले आहे.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने