अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेचा महाड, चिपळूण आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी! "एक हात मदतीचा "!!



मुंबई-परेल-प्रतिनिधी
सध्याच्या कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली. इतकंच नव्हे तर कोल्हापूर गावांत देखील घरं च्या घरं उध्वस्त झाली.  एका रात्री होत्याचे नव्हते झाले.तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने  अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेने "एक हात मदतीचा "या उपक्रमांतर्गत जवळजवळ ८० ते ९० कुटुंबीयांना सामाजिक  कर्तव्य म्हणुन ब्लँकेट, वनस्पती तूप, चटई, नवीन कपडे, सनिटरी नॅपकिन, पाणी बॉटल , शैक्षणिक साहित्य तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य पालन केले आहे. अशा संकटात अक्षरा सामाजिक प्रतिष्ठान संस्थेने नेहमीच आपला खारीचा वाटा उचलला आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल वंजारे यांनी या सामाजिक कार्यासाठी हातभार लावलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले आहेत.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने