धुळे प्रतिनिधी -
शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 13 ऑगस्ट रोजी कंटेनर वाहनाचे अपहरण करून त्यातील 75 लाख 7 हजार 950 रुपये किमतीच्या मुद्देमाल चोरी झाल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याच उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना सूचना देण्यात आला होता त्या अनुषंगाने केलेल्या कारवाईत धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना यश आले असून सदर गुन्ह्यातील मुद्देमाल व आरोपी यांना अटक करण्यात धुळे पोलिसांना यश आले आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी रामदास हरदयाल पाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 16 जुलै रोजी गौतम बुद्ध नगर उत्तर प्रदेश येथून वाहन क्रमांक एच आर 55 एल 9002 या वाहनातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्पेअर पार्ट व इतर वस्तू असा एकूण 75 लाख 7 हजार 950 रुपये किमतीच्या माल लोड करून दिल्ली मार्गे औरंगाबाद महाराष्ट्र येथे येत असताना त्यांना दिल्लीच्या अगोदर रस्त्यामध्ये एक इसम भेटला व त्याने मला धुळे येथे जावयाचे आहे असे सांगून वाहनात बसल्यानंतर वाहनचालकाच्या विश्वास संपादन करत शिवपूरी मध्य प्रदेश येथे ढाब्यावर जेवण करत असताना ट्रक चालकास कोल्ड्रिंक्स मधून नकळत गुंगीकारक औषध देऊन हा ट्रक थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीतील गोल्ड रिफायनरी समोर आणून येथे वाहनाच्या जीपीएस रूट कट करून सदर वाहन नवापूर मार्गे नेऊन माल कुठे कधी अज्ञातस्थळी उतरला व ट्रकचालकास तलासरी पालघर येथे सोडून दिले. चालकाची गुंगी उतरल्यानंतर त्याने ट्रकमधील माल मिळून आला नाही . सदर इसमाने ट्रकमधील माल फसवणूक करून चोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने यासंदर्भात थाळनेर पोलीस ठाण्यात येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपास करत असताना सदरचा गुन्हा हा पलवल जिल्हा पुरहाना हरियाणा येथील जमशेद खान दिनू खान व त्याची साथीदाराने केला असल्याची शक्यता वाटत असल्याने सदर संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी व त्यांचे पथक यांना हरियाणा येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने येथे जाऊन जमशेद खान दिनू खान व अब्बास खान राहणार पलवल हरियाणा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार यांच्यासह केल्याची कबुली देऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हा सुरत येथील शशिकांत उपाध्याय व अरुण कुमार पांडे यांच्याकडे ठेवला असल्याचे सांगितले. त्यानुसार सदर पथकाने हरियाना येथून ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना सुरत येथे जाऊन संबंधित आरोपींच्या येथे छापा टाकून इतर दोन आरोपींना देखील ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या माला पैकी एकूण 66 लाख 82 हजार 676 रुपये किमतीच्या मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे याच सदर गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात आली असून आरोपींकडून अधिक गुन्हे झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून चौकशी सुरू आहे
सदर गुन्ह्यात आरोपी 1)जमशेद खान दिनू खान रा. पिरगढि ता. जिल्हा पलवल 2) अब्बास विशू खान रा .गोधोला जिल्हा नुह हरियाणा 3) शशिकांत धरणिधर उपाध्याय रा.पांडेसरा जिल्हा सुरत गुजरात 4)अरुण कुमार रमाशंकर पांडे राहणार कडोदरा सुरत गुजरात यांना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव सो धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत,पीएसआय बाळासाहेब सूर्यवंशी, योगेश राऊत, पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील ,संदीप पाटील, पोलीस नाईक कुणाल पाटील, संदीप शरद ,रविकिरण राठोड, रवींद्र महाडिक ,विशाल पाटील, सुनील पाटील, मनोज महाजन, मनोज बागुल इत्यादींनी केले आहे.
Tags
news

