अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन..!



अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्यावतीने कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूर येथे मराठी चित्रपट निर्मात्यांचे चिंतन शिबीर तसेच पत्रकार परिषदचे आयोजन शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी केले आहे.सदर शिबीराला निर्माता महामंडळाचे अध्यक्ष श्री.देवेंद्र मोरे मार्गदर्शन करणार आहेत. शिबीराचे नियोजन महामंडळाचे उपाध्यक्ष श्री.मुरलीधर दिक्षीत व पश्चिम महाराष्ट्र प्रमुख श्री.विजय शिंदे यांनी केले आहे.या शिबीराला उपाध्यक्ष श्री.बाळासाहेब गोरे,मुख्य प्रसिद्धी प्रमुख श्री.महेश्वर तेटांबे,खजिनदार श्री.राजु शेवाळे,श्री.पी.व्ही.कोळी व पश्चिम महाराष्ट्रातील मराठी चित्रपट निर्माते तसेच पत्रकार मंडळी उपस्थितीत राहणार आहेत.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने