औषध निर्माण अधिकारी हा आजपर्यत पडद्यामागचा कोविड योद्धा.- डॉ.पंकज चौधरी



शिरपूर -विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेतील एक क्षेत्र म्हणून फार्मसी कडे पाहिले जाते. नवीन औषधांची निर्मिती;जी औषधे आहेत त्यांच्यात काळानुसार बदल करणे,विकास करणे आणि औषधांचे वितरण आदी काम या क्षेत्रातील पदवीधर म्हणजेच फार्मासिस्ट (औषध निर्माता) करतात.
     रुग्णांच्या आजारावर डॉक्टर औषध देतात या औषधांचे उत्पादन करणे नवनवीन औषधे शोधणे औषधांची गुणवत्ता तपासणे आणि सांभाळणे औषध बाजारात आणण्यापूर्वी प्रयोगशाळेत त्याची तपासणी करणे या औषधांचे मानवी शरीरावर  दुष्परिणाम (साईड इफेक्ट) होऊ नये याची खबरदारी घेणे ही सर्व कामे  फार्मासिस्ट (औषध निर्माता) करत असतो.
        फार्मासिस्ट हा हेल्थकेअर  सिस्टम म्हणून आरोग्य क्षेत्रातील एक प्रमुख म्हणून ओळखला जातो.
           हॉस्पिटल फार्मसिस्ट,कमुनिटी फार्मासिस्ट,इंडस्ट्रियल फार्मासिस्ट,रिटेल फार्मासिस्ट, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 'रिसर्च' फार्मासिस्ट अशा अनेक प्रकारे औषध निर्माता म्हणून ओळखला जातो. अशा प्रकारे फार्मासिस्टचा( औषध निर्माता)          याचा परिचय माझ्या मते आहे.               आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्ट हा प्रमुख घटक माझ्या मते उच्चस्तरावर मानला पाहिजे परंतु कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या लढाईमध्ये भारतातील सर्व डॉक्टर नर्स सफाई कामगार आणि पोलीस प्रशासन यांचा सन्मान मी पण केला पण त्याच सोबत फार्मासिस्टने (औषध निर्माता)ने स्वतःचे मोलाचे योगदान देशासाठी दिले आणि देत आहेत तरी पण फार्मासिस्टचा कोणी उल्लेखही केला नाही याची खंत मला वैयक्तिकरित्या वाटते.  फार्मसिस्टला  कोरोना योद्धा म्हणुन पाहिजे तितके खाजगी आणि सरकारी स्तरावर स्थान मिळाले नाही याचे आश्चर्य वाटते.
 पाहिले गेले तर फार्मासिस्ट डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील महत्त्वाचा दुवा घटक ओळखला जातो कारण रुग्णसेवेत औषध निर्माता हा प्रथम मानला जातो आणि मानला गेला पाहिजे असे माझे मते आहे कारण डॉक्टर रुग्णांना जीवदान औषधा मार्फत देतात आणि फार्मासिस्ट औषधांना जीवन देण्याचे काम करतात.डॉक्टरांच्या हातात औषध असेल तर डॉक्टर,नर्स रुग्णांना उपचार करतील हे औषध आणि इंजेक्शन आम्ही फार्मासिस्ट तयार करतो. कोणत्याही औषधांचे काम इंजेक्शन गोळ्या इतर औषधे जे काही औषधे असतील ते फार्मासिस्ट औषध निर्माता द्वारे निर्मिती होत असते थोडक्यात सांगायचे झाले तर औषध निर्माता हा औषध निर्मिती करतो आणि डॉक्टर हेच औषध अनेक प्रकारे रुग्णांना उपचारासाठी देतात
 बोलायचे झाले तर बाहेरच्या विकसित देशात तेथील डॉक्टर आणि फार्मासिस्ट हे एकाच  नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. डॉक्टर रुग्णांना रोगाचे निदान करून उपचार करतात तर  फार्मासिस्ट औषधांचे उत्पादन करून त्यांना माहिती पुरवतं असतो.
 कोरोनात आपल्या केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने फार्मासिस्ट ला प्रथम प्राधान्य पाहिजे तसे नाही दिले कोरोना योद्धा म्हणून वैयक्तिक  घोषित तर नाहीच केले पण कोरोना लसीकरणापासून अनेक फार्मासिस्ट वंचित ठेवले.  कोरोनात फार्मासिस्टने अनेक प्रकारे हॉस्पिटलमध्ये वेळोवेळी रात्रंदिवस रुग्णांना सेवा दिली. अनेक फार्मसिस्ट वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना सेवा देण्याचे काम केले आणि करत आहेत. अभिमानास्पद आहे.                   
पण फार्मासिस्ट नेहमी मागेच राहिला म्हणून फार्मसिस्ट हा 
पडद्यामागचा हिरो ठरला...
 फार्मासिस्ट हा किंग नाही तर किंग मेकर आहे...
 
''सलाम त्या सर्व डॉक्टरांना, फार्मासिस्ट, सफाई कामगार, आणि सरकारी पोलीस  प्रशासनास आणि आरोग्य क्षेत्रातील वेगवेगळ्या प्रकारे काम करणाऱ्य योद्धाना"... 
    अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन, Dr. Pankaj M. Chaudhari

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने