शिंदखेडा - सध्या शहरासह परिसरात अवैध उपसा करणाऱ्यांनी अक्षरशः हैदोस घातल्याचे वेळोवेळी केलेल्या कारवाईतून निदर्शनास येते आहे. दि. 4 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पहाटे सहा वाजेच्या सुमारास टाकरखेडा ता. शिंदखेडा शिवरात तापी नदी पात्रात अप्पर तहसीलदार यांनी छापा टाकला असता सदर ठिकाणी दोन ट्रॅक्टर मध्ये वाळू भरणे चालू होते. तर तीसरे ट्रॅक्टर हे संशयित रित्या तापी नदीत उभे असल्याचे निदर्शनास आले. यावेळी संबधित ट्रॅक्टर चालकाला याबाबत वाळू वाहतूकीचा परवाना विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले त्यावेळी लक्षात आले की सदर वाळूही अवैधरित्या उपसा केले जात असल्याने सदर ट्रॅक्टर हे स्वतः तहसीलदार यांनी ट्रॅक्टरवर बसून दोंडाईचा पोलीस ठाण्यात जमा केले आहे.
सविस्तर माहिती अशी की, अपर तहसीलदार सुदाम महाजन यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा मार्फत टाकरखेडा शिवारात तापी नदी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याची खात्री करण्यासाठी घटनास्थळी जायला दुचाकीने थेट नंदुरबार तालुका गाठत त्यामार्ग भादवड, बह्याणे, ता. नंदुरबार मार्गाने टाकरखेडा ता. शिंदखेडा शिवारात तापी नदी पात्रात खात्री केली असता. सदर ठिकाणी चौकशी केली असता तिथे तापी नदी पात्रात हिरव्या रंगाचे दोन सोराज ट्रॅक्टर मध्ये वाळू भरली जात होती व एक ट्रॅक्टर तापी नदी पात्रात उभे होते.
ट्रॅक्टर चालकाला नाव गाव विचारले असता त्यावेळी त्याने ट्रॅक्टर एम. एच 18 ए एन 1892 चालक अरविंद विठ्ठलसिंग गिरासे, मालक संग्राम कोमलसिंग गिरासे 2) एम. एण 18 ए एन 0931 चालक व मालक भूषण प्रकाशसिंग गिरासे 3) विनाक्रमांक चालक भिका जगन कोळी मालक विनोद दिनेश ठाकरे सर्व रा. टाकरखेडा ता. शिंदखेडा यांच्याकडे वाळू वाहतूकीचे परवाने विचारले असता त्यावेळी त्यांच्याकडे कुठलेही परवाना मिळून आले नाहीत. म्हणून अप्पर तहसीलदार सुदाम महाजन स्वतः नदी पात्रातून ट्रॅक्टरवर बसून दोंडाईचा पोलीस ठाण्यात तीनही ट्रॅक्टर जमा करण्यात आले. मागील काही दिवसापासून अवैध वाळू उपसा संदर्भातील वेळोवेळी करण्यात आलेल्या कारवाईतून असे लक्षात येते की सध्या शहरासह परिसरात शासनाचा महसूल बुडवत अवैध वाळू उपसा करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. याकडे जिल्हाधिकारी संजय यादव व शिरपूरचे प्रातं अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी जातीने लक्ष घालून तालुक्याभरात मोहीम राबवून अवैध वाळू उपसा करणाऱ्या चाप बसवावा अशी मागणी नागरिकांन कडून केली जात आहे. सदरची कारवाई अपर तहसिलदार सुदाम महाजन, तलाठी डी. ए. भगत, तलाठी एस.एस. कोकणी, तलाठी एन.एस. माजलकर, चालक युवराज माळी आदींनी केली आहे..
Tags
news
