पाटोदा येथे "प्रहार" संघटनेची नवीन कार्यकारिणी जाहीर,




नाशिक  शांताराम दुनबळे 

     नाशिक-: येवला तालुक्यातील  पाटोदा येथे  गेल्या दोन महिन्यापूर्वी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री हरिभाऊ महाजन यांनी पाटोदा येथील प्रहार संघटनेची कार्यकारिणी बरखास्त केली, दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये व जनतेत याबाबतीत उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते आणि म्हणून, आज प्रहार संघटनेचे बुलंद तोफ जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांनी पाटोदा येथील नवीन कार्यकारणी जाहीर करून सर्व चर्चांना पूर्णविराम दिला .आज पाटोदा येथे कोरोना चे सर्व नियम पाळून प्रहार संघटनेचे  जिल्हाध्यक्ष श्री. गणेश निंबाळकर यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
               याप्रसंगी चांदवड तालुका अध्यक्ष श्री .प्रकाश चव्हाण व येवला तालुका अध्यक्ष श्री. हरिभाऊ महाजन, येवला तालुका उपाध्यक्ष श्री. शंकर गायके, पाटोदा शाखाध्यक्ष श्री. चेतन बोरणारे, शाखा उपाध्यक्ष श्री. श्याम मेंगाणे तसेच प्रहारचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी श्री रामभाऊ नाईकवाडी यांची येवला तालुका उपाध्यक्षपदी तर श्री.सुनील भाऊ पाचपुते यांची पाटोदा गट प्रमुख पदी निवड करण्यात आली. यावेळी प्रहारचे श्री. संजय  मेंगाने यांनी आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने