प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: इंदापूर तालुक्यातील पडस्थळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुणांनी,शाळकरी मुलांनी, महिलांनी प्राथमिक शाळा परिसरात स्वच्छता केली. ग्रामस्थांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी गावातील सर्व कुटुंबांना कॅल्शियम व विटामिन सी, विटामिन डी थ्री, झिंक टॅबलेट, ORS पावडर पॅकेट, आयर्न फॉलिक ऍसिड टॅबलेट या गोळ्यांचे वाटप मार्केट कमिटीचे मा. उपसभापती पांडुरंग मारकड व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना काळामध्ये गावात ज्या व्यक्तींनी महत्वाची जबाबदारी पार पाडली अशा व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य सेविका वर्षा मुसळे, अंगणवाडी सेविका सिंधुताई कोकरे, अंगणवाडी मदतनीस देवई बंड, पोलीस कर्मचारी शैलेश हंडाळ, मुख्याध्यापक रमेश जाधव, प्राथमिक शिक्षक सुरेश घोळवे, शशिकांत शेंडे आदींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अमोल कोळेकर यांनी केले तर ऋशांत सरक यांनी आभार मानले. यावेळी गोकुळ कोळेकर, सुहास मारकड, ज्ञानेश्वर कोळेकर, उदय चौगुले, रोहित शिनगारे, शंकर ढिरे, शिवाजी राऊत, सुरेश हाके,योगेश पांडुळे, विठ्ठल मारकड, आकाश मारकड आदी उपस्थित होते.
Tags
news
