शिरपुरात शिवसेने तर्फे शिवगुढी उभारून उस्साहात शिवस्वराज्य दिन साजरा





शिरपूर - मा. मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे व महावीकास आघाडी यांच्या माध्यमातुन एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. 6 जून हा दिवस
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वराज्य स्थापनेचा दिवस असून हा दिवस दी. 6 जून 2021 पासून शासन स्थरावर शिवस्वराज्य  दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश शासन स्थरावर देण्यात आले आहेत. 
 या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता महाविकास आघाडीच्या निर्णयावर अत्यंत खुश आहे याचाच एक भाग म्हणून दी.  6 जून रोजी शिरपूर विधानसभा शिवसेने तर्फे शिवगुढी उभारून अत्यंत उस्साहात शिवस्वराज्य दिनाचा कार्यक्रम शिवसेना पक्षकार्यालय शिरपूर संपन्न झाला.
या वेळी . भरतसिंग राजपूत - उपजिल्हाप्रमुख धुळे ग्रामीण, छोटुसिंग राजपूत - शिरपूर विधानसभा संघटक ,राजू टेलर, तालुकाप्रमुख दीपक चोरमले , शहरप्रमुख देवेंद्र पाटील ( देवाजी ) ,योगेश सूर्यवंशी तालुका संघटक, राष्ट्रवादी उपजिल्हाअध्यक्ष श्री. निलेश गरुड,, युवासेना तालुका युवाधिकरी अनिकेत बोरसे, युवासेना उपतालुका अधिकारी जितेंद्र राठोड, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका  सौ. वीणा वैद्य ,महिला आघाडी तालुका संघटक अर्चना देसले, महाराष्ट्र वाहतूक सेना शहराध्यक्ष जितेंद्र पाटील, गणेश बिरारी , विजय पवार, मसूद शेख ,  वाजीद मलिक, बबलू शेख, दिनेश गुरव , तुषार महाले व शिवसैनिक उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने