यवत
कोरोनाव्हायरस मुळे सुरु असणार्या लॉकडाउनमुळे अनेक गोरगरीब अडचनीत सापडले असतांना गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी गणेश शेळके यांच्या प्रयत्नाने यवत येथील अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट व सेव्ह द चिल्ड्रन संस्था पुणे या संस्था पुढे आले असुन त्यांच्या वतीने अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट यवत save द चिल्ड्रन संस्था पुणे 100 कुटुंबासाठी एक महिन्याचे किराणा व आवश्यक साहित्य देण्यात आली यामध्ये दहा किलो तांदूळ, दहा किलो पीठ, तूरडाळ, मूगडाळ, सोयाबीन, मीठ साखर, चहा पावडर, २ कि गोडतेल अशा विविध वस्तूंचा समावेश करण्यात आला होता
रोज मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अनेकांना या उपक्रमाने आधार मिळाला आहे.
संपुर्ण देशात कोरोनाची दशहत आहे. तर कोरोनावर मात करण्यासाठी संचारबंदी सुरु आहे. या संचारबंदीमुळे प्रतेकाचे कामधंदे बंद आहे व त्यामुळे अनेक गोरगरीबावर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अश्या परिस्थीतीत
अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट , सेव्ह द चिल्ड्रन या संस्था पुढे आले आहे.
आज १०० कुटुंबाना ह्या किराणामालाचे वाटप करण्यात आले असुन यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवण्याचा मानस संस्थेचा असेल गोरगरीबांची जनसेवा ही इश्वरसेवा असल्याचे लक्षात घेऊन हे सदैव संकटाच्या वेळी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहे अन्नधान्य वाटपचा कार्यक्रम हा कोणताही गाजावाजा न करता करण्यात आला
यावेळी अनुराग चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष विजय काटम , सचिव सुनिता काटम, यवतचे सरपंच समीर दोरगे, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके, साक्षी काटम,अनुराग काटम, तर
सेव्ह द चिल्ड्रन संस्थाचे व्यवस्थापक
हरीश वैद्य व इपशिता दास उपस्थित होते
Tags
news

