चादंवङ ला श्री नमोकार तीर्थावर ५१फूट शिलेचे भव्य दिव्य स्वागत संपन्न नाशिक शांताराम दुनबळे





    नाशिक-: चादंवङ येथें   राष्ट्रसंत श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने निर्मित श्री नमोकार तीर्थावर ५१ फूट उंच  अरिहंत भगवान यांची खड्गासन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा लागणारा भव्य असा ३६५टनाचा पाषाण  १६४ चाकांच्या ट्रकमधून  २१ दिवसापासून आणला जात होता  आज सकाळी नमोकार तिर्थावर आगमन होताच  जैन बांधवांना आनंदाचा पारावर उरला नाही वाजतगाजत अकरा सुवासिनीनी कळस घेत प्रवेश द्वारावर  आचार्य श्री चां जयजयकार घोषणा देत स्वागत केले  श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजनविधी केला   प्रितम शहा पळसदेवकर,प्रकाश शेठी नांदेड, विजय कासलीवाल नांदेड  परिवाराच्या वतींने पूजन करण्यात आले ,मांगीतुंगीजी ट्रस्ट अध्यक्ष सुमेर काला ,चांदवड प्रथम नगराध्यक्ष भूषण कासलीवाल,रवींद्र पाटणी  यांनी पुष्पवृष्टी केली,    संतोष पेंढारी नागपूर, तीर्थरक्षा  कमिटी संजय पापडीवाल,  ललित पाटणी  यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली
 ह्याप्रसंगी  केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, खासदार कृपाल सुमाणे ,  पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलाइन भाषणात   शुभेच्छा दिल्या  व नमोकार तीर्थावर भविष्यात लागणाऱ्या कार्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले        महावीर गँगवाल,   अनिल जमगे, प्रमोद कासलीवाल,   नवीन पहाडे, विनोद लोहाडे, जयकुमार कासलीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन संपन्न   झाले    शैलेश कासलीवाल    पवन पाटणी, मनोज शहा  ,रवींद्र पहाडे      पारस लोहाडे,वर्धमान पांडे ,राजेंद्र कासलीवाल मनोज कासलीवाल  ,प्रवीण संचेती,यांच्या हस्ते आचार्य कुंथुसागर महाराज प्रतिमा पूजन   करण्यात आले आचार्य श्री देवनंदीजी महाराज व नवीननदिजी महाराज  यांचे प्रज्ञाश्रमन  बहुमंडलच्या वतीने पाद प्राक्षलन करण्यात आले  सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी आभारप्रदर्शन ब्रम्हचारी वैशालिदीदी यांनी केले यावेळी सकाळ जैन समाज यांनी आपली उपस्थिती लावली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने