बुलडाणा | ६ जून
सह्याद्रीचे शिवभक्त सामाजिक संस्था अंतर्गत आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप समाजकार्य आणि विविध सामाजिक मदत कार्य यामध्ये नेहमीच पुढे असतो.
यावेळी श्री शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप द्वारे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना फळ, पाण्याची बॉटल, मास्क आणि सॅनिटायझर यांची वाटप करण्यात आली. आणि सर्व जनतेमध्ये कोविड बद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच सर्वांना कोविड प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे स्थित देशभरातील मनोरुग्णांसाठी आसरा असलेले सेवा संकल्प प्रतिष्ठान या प्रकल्पाला भेट देऊन पौष्टिक फळे, गहू आणि तांदूळ भेट स्वरूपात देण्यात आलेत.
यावेळी ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकारी सदस्य गण उपस्थित होते.
Tags
news
