वीज कंपनीकडून मागणी पूर्ण झाल्याने शिरपूर भाजपाचा कृषी पंपाच्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबतचा आजचा मोर्चा रद्द






शिरपूर : वीज कंपनीकडून मागणी पूर्ण झाल्याने शिरपूर भाजपाचा कृषी पंपाच्या अनियमित विद्युत पुरवठ्याबाबतचा आजचा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.

 तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित विदयुत पुरवठा करण्यात यावा अन्यथा सोमवारी विज कंपनी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा भाजपातर्फे देण्यात आला होता. शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी नियमित विज पुरवठा व्हावा अन्यथा शेतकरी बाहेरील तालुक्यात जाणारी वीज स्वतः खंडीत करून विज वितरण कंपनी कार्यालयावर आमदार काशिराम पावरा, भा.ज.प. प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि. ७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजेला काढण्यात येईल असा इशारा शिरपूर भा.ज.पा. तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी निवेदनातुन दिला होता.

उपविभाग क्र. २ अंतर्गत होळनांथे उपकेंद्र येथे वादळामुळे लाईनचे पोल व तार तुटल्यामुळे जापोरा फिडरचे ब्रेकर नादुरुस्त झाले होते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात सदर फिडरचा लोड दुसऱ्या फीडरवर टाकण्यात आला होता. सदर ब्रेकरचे काम पूर्ण करण्यात आले असून ब्रेकर पूर्ववत सुरु करण्यात आला आहे. तसेच होळनांथे उपकेंद्र येथे पॉवर ट्रान्सफॉर्मर नं. १ सद्यस्थितीत लोड वाढल्यामुळे ओवरलोड होत होता. तरी दि ६.६.२०२१ रोजी सदर पॉवर ट्रांसफार्मर क्र. १ चा लोड हा पॉवर ट्रांसफार्मर क्र. २ वर टाकून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. असे माहितीचे पत्र आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांना श्री नेमाडे, उप कार्यकारी अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि. शिरपूर उपविभाग क्र. २ यांनी कळविले आहे. त्यामुळे दि. ७ जून रोजीचा भाजपा तर्फे काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला आहे असे भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने