शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील वर्तमानपत्र क्षेत्रात बुलंद तोफ म्हणून ओळख असलेले दैनिक राष्ट्र उदय चे संपादक भाऊ सो सतीश गिरासे यांचे आज दिनांक 3 जून रोजी दुपारी साडेबारा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .सतीश गिरासे हे पोलीस टुडे चे संपादक रत्नदीप सिंह सिसोदिया यांचे लहान बंधू होते. सतीश गिरासे हे मागील तीन वर्षांपासून एका दुर्धर आजाराने ग्रसित झालेले होते. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी व त्यांच्या परिवाराने भरपूर प्रयत्न करून देखील त्यांना या आजारातून दिलासा मिळाला नाही आणि आज अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला.
अत्यंत सामान्य कुटुंबातून अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथून पत्रकारिता करण्यासाठी या दोन बांधवांनी शिरपूर शहरात आपला व्यवसाय सुरु केला आणि आपली प्रचंड मेहनत जिद्द च्या जोरावर हे दोन्ही बंधू पत्रकारिता क्षेत्राचे क्षेत्रात आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण करून राजकीय आणि सामाजिक जीवनात वर्चस्व निर्माण करून प्रवाहाच्या विरोधात आपली भूमिका मांडून जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देत पत्रकारितेच्या यशोशिखरावर पोहोचले. अडचणीच्या काळात रत्नदीप भाऊंना सतीश भाऊंनी मोलाची साथ दिली आणि दैनिक राष्ट्रवादीची धुरा आपल्या हाती घेऊन दैनिक राष्ट्रवादीला त्यांनी घराघरात मनामनात पोहोचवून आपली पत्रकारितेची छाप सोडली .मात्र दुर्दैवाने वयाच्या 51 व्या वर्षी पत्रकारिता क्षेत्रातून त्यांनी एक्झिट घेतली असून आज त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. सतीश गिरासे यांचे जान्याने शिरपूर तालुक्यातील पत्रकार क्षेत्रासाठी फार मोठी हानी असून त्यांची उणीव भरून काढणे शक्य नाही. आमचे परममित्र आणि मार्गदर्शक सतीश भाऊ यांच्या मृतआत्म्यास परमेश्वर चिरशांती प्रदान करो हीच निर्भीड विचार न्यूज परिवाराकडून श्रद्धांजली.
Tags
news
