होळनांथे प्रतिनिधी
येथील दक्ष नागरिक युवा मंचतर्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
दक्ष नागरिक युवा मंच व आई जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे वृक्ष संवर्धन व पर्यावरण संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जात असतात ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त होळनांथे येथे संस्थेतर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते योगेश कोळी, सर्पमित्र मुक्तार फकीर, संस्थेचे संचालक बबलू परदेशी आदींची उपस्थिती होती.
Tags
news
