"आरोग्यम् धनसंपदा" हे वाक्य आपण नेहमी ऐकतो . सुदृढ आरोग्यासाठी आहार, विहार, व्यायाम या त्रिसूत्री आवश्यक आहेतच ,पण त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हेही महत्त्वाचे आहे . मग ही रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवावी?
या प्रश्नाचे उत्तर "रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारे मायक्रोग्रींन्स" या डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई आयोजित ऑनलाईन कार्यशाळेत मिळाले.या कार्यशाळेसाठी सृष्टीज्ञान संस्थेच्या संगीता खरात मॅडम प्रमुख अतिथी म्हणून लाभल्या.त्यांनी मायक्रोग्रींन्स का व कसे उगवावेत?मायक्रोग्रींन्स उगवण्यासाठी लागणारे साहित्य कोणते? वेगवेगळ्या प्रकारच्या बिया,रोपांची काळजी कशी घ्यावी ?आरोग्याला काय काय फायदे होतात ?या आणि अशा अनेक प्रश्नांची उकल या वेबिनार मध्ये झाली.या कोरोना काळात आपण पौष्टिक ,सकस अन्नाबरोबर जर या मायक्रोग्रीन्सचा देखील आहारात वापर केला तर प्रतिकार शक्ती वाढायला नक्कीच मदत होईल असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैशाली मंडलिक, प्रिया उपासनी, समीक्षा तावडे, रेवती येवला तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे व सर्व उपस्थितांचे विशेष योगदान लाभले.
या उद्बोधक कार्यशाळेला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .तसेच अनेक शंकांचे निरसनही या कार्यक्रमातून झाले. अशाच वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा घेण्याचा मानस सोहम अकादमीच्या संचालिका डॉक्टर मीनल भोळे मॅडम यांनी बोलून दाखवला व रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवून कार्यक्रमाची सांगता झाली.
Tags
news
