शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या सौ अभिलाशा भरत पाटील यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांना निवेदन देऊन शिरपूर तालुक्यात कोरोना वर प्रभावी असलेले लसीकरण मोहीम ही ग्रामपंचायत स्तरावरून राबवण्याबाबत मागणी केली आहे
यात त्यांनी असे म्हटले आहे की तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे कोरोना लसीचे डोस पुरवण्यात येत आहेत. परंतु सदर चे डोस हे फक्त आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे उपलब्ध होत असल्याने लसी साठी गर्दी होत असून अनेक वेळा डोस चे प्रमाण कमी असल्यामुळे नागरिकांना माघारी देखील परत जावे लागत आहे .
शिवाय प्रत्येक उपकेंद्राच्या कक्षेमध्ये आठ ते दहा गावे येतात त्यामुळे अनेकवेळा गर्दी होत आहे आणि म्हणून सदरची लसीकरण मोहीम ही प्रत्येक गावस्तरावर ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी पाटील यांनी केले आहे
Tags
news
