कोरोना नियमांचे उल्लंघन वधूपिता वर गुन्हा दाखल




 शिरपूर प्रतिनिधी - सध्या राज्यात ब्रेक द चेन च्या अंतर्गत नियमावली लागू करण्यात आली  असून साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये  अटी आणि शर्ती  नियम लागू आहेत .
या अंतर्गत विवाह प्रसंगी पूर्व परवानगी घेऊन फक्त 25 लोकांनाच विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यास व 2 तासात विवाह सोहळा पूर्ण करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत.
 शिरपूर तालुक्यातील अर्थ या गावात दिनांक 27 मे रोजी रात्री नऊ ते दहा वाजेच्या सुमारास नाना धुडकू साळुंके यांच्या मुलीचे लग्न कार्य यानिमित्त हळदीच्या कार्यक्रमात डीजे वाजंत्री लावणी लावून अंदाजे 300 ते 400 सर्वांची गर्दी जमल्याने ग्रामसेवक राजेंद्र आधार माळी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वधूपिता च्या विरोधात साथरोग अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 सदर प्रकरणांमध्ये कोणतीही परवानगी न घेता आल्यामुळे साथ रोगप्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाले असून जिल्हाधिकारी सो धुळे, महाराष्ट्र शासन, मुख्य कार्यकारी अधिकारी जी प  धुळे व गटविकास अधिकारी शिरपूर यांनी जारी केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली आहे .
 सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने  सो,पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एसइ जी.डी . पावरा करत आहेत.
 पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी शिरपूर शहर व तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन केले आहे की सध्या शहरात व तालुक्यात साथ नियंत्रण कायदा लागू असल्याने नियमांचे पालन करून अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन केले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने