सोनशेलू रेल्वे स्टेशनवर कोरोना महामारीच्यागोदर सुरत-भुसावळ ही पॅसेन्जर गाडी थांबत होती.त्यामुळे पंचक्रोशितील प्रवाशांना लाभ मिळत होता.पण जागतिक महामारी आल्यानंतर प्रवाशी वाहतुक काही काळासाठी बंद करण्यात आली.आता पॅसेन्जर रेल्वे वाहतुक पुन्हा सुरळित झाली असुन पण सोनशेलू येथे पॅसेन्जर गाडीला थांबा देण्यात आला नाही.त्यामुळे सोनशेलू, वरूळ-घुसरे, जोगशेलू,चौगाव ब्रु।।,चौगाव ख्रु।।,भडणे,हातनुर,मेथी,वरझडी या गावातील नागरिकांना दळणवळणाचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत असुन, म्हणून वाहतुक पुन्हा सुरळित व्हावी यासाठी मुख्य रेल्वे वाणिज्य अधिकारी श्री राजकुमार कुरली साहेबांना निवेदन देवून मेमो गाडीला देखिल प्रवाशांच्या मागणीमुळे थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच- प्रतिनिधी श्री धिरज बडगुजर, उपसरपंच-श्री हारसिंग राजपूत, ग्राम पंचायत सदस्य-श्री भाईदास बडगुजर, श्री दिलीप गिरासे, माजी सरपंच-श्री जयसिंग गिरासे,सामाजिक कार्यक्रते-श्री बापुसिंग गिरासे,नंदुरबार येथिल नगरसेवक -श्री दिलिप बडगुजर आदि उपस्थित होते.
Tags
news
