नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक-:चांदवड शासकीय उप जिल्हा रुग्णालयात जय हनुमान विधायक बहुउद्देशीय संस्था देवगाव (देनेवाडी) तालुका चांदवड यांचे मार्फत उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी आजार लवकर बरा होवो यासाठी वाफेचे मशीन भेट देण्यात आले.सदरील संस्थेचे कार्यकर्ते नेहमीच सामाजिक कार्यात सहभागी असतात.यावेळी उपजिल्हा रुग्णालयात डॉ विष्णू पालवे डॉ सोनवणे यांचे कडे वाफेचे मशीन सुपूर्द करण्यात आले . यावेळी रुग्णालयात जय हनुमान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सोमनाथ जाधव ,
सोबत शिवसेना शहरप्रमुख श्री संदीप उगले , दत्तात्रय (आबा) गांगुर्डे ,ब्लु पँथराचे पांडूरंग भडांगे , दीपक शिरसाठ, पत्रकार विकी गवळी आदी उपस्थित होते.
Tags
news