सरपंच परिषद महाराष्ट्र जिल्हा समन्वयक पदी सौ स्वप्ना राजेंद्र वांजुळे यांची निवड





विरेगाव प्रतिनिधी/ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावचा विविधांगी विकास साधण्याबरोबरच खास सरपंचासाठीच कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र या संघटनेच्या जिल्हा समन्वयकपदी जालना तालुक्यातील ग्रामपंचायत चितळी पुतळीच्या प्रथम नागरीक सरपंच सौ. स्वप्ना राजेंद्र वांजुळे यांची निवड करण्यात आली. कोरोना पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने संपन्न झालेल्या एका बैठकीत प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे उपाध्यक्ष अनिल गिते, प्रदेश महासचिव विकास जाधव महिला प्रदेश अध्यक्षा राणी पाटील मराठवाडा समन्वयक डॉ.प्रल्हाद वाघमारे यांच्या वतीने सौ. स्वप्ना वांजुळे यांच्या सह राजेश मोठेबा म्हस्के बेलेरो ता.जाफ्राबाद, भावना रामेश्वर ठेंग जवखेडा ता.जाफ्राबाद,सुरज कचरु शहाणे सिरसगाव ता.भोकरदन,लक्ष्मण धर्मा पवार ता. जालना यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र  दिले आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, परिषदचे सभासद वाढविण्याबरोबरच तालुकास्तरावर समन्वयकांच्या निवडी करून संघटनेच्या ध्येय धोरणानुसार काम करावे. तसेच संघटना वाढीसाठी प्रयत्न करावेत.
जालना जिल्ह्यातील सरपंचांच्या असणाऱ्या विविध अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचांना या संघटनेत सामावून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचे सौ. स्वप्ना वांजुळे यांनी सांगितले. या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते- पाटील, प्रदेश महासचिव विकास जाधव, राज्य महिला अध्यक्षा राणी पाटील, प्रदेश कोअर कमिटीचे प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य महिला उपाध्यक्षा अश्विनी थोरात, सुप्रिया जेथे यांनी या अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

 सरपंच परिषद ही सरपंचाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारी आक्रमक  संघटना म्हणून राज्यात नावारूपास आली आहे. तसेच या संघटनेच्या माध्यमातून सरपंचांच्या समस्या बरोबरच गावस्तरीय विकासात्मक कामे करण्यासाठी उद्भवणाऱ्या अडचणी बाबत अनेक निर्णय शासनास घ्यायला भाग पाडले आहे.
सौ.स्वप्ना वांजुळे या त्यांचे पती गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र वांजुळे यांच्या सोबत  चळवळीतील कार्यकर्ते असून त्यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. त्यांच्या निवडीने जिल्ह्यातील सरपंचांची संघटना मजबूत होण्यास आणखीन बळ मिळाले आहे. या निवडीबद्दल सर्वच राजकीय सामाजिक स्तरातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी चितळी पुतळी येथे ग्रामस्थाच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटुन स्वागत व शुभेच्छा दिल्या
--------------------------------------------------------------------
प्रतिक्रिय
जालना जिल्ह्यातील सरपंचांच्या असणाऱ्या विविध अडीअडचणी सरकार दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक गावातील सरपंचांना या संघटनेत सामावून घेऊन त्यांना न्याय देणार असल्याचे सौ. स्वप्ना वांजुळे यांनी सांगितले व सरपंच परिषदेने केलेली निवड सार्थ ठरवून न्याय देण    

  -  सौ. स्वप्ना राजेंद्र वांजुळे
 सरपंच चितळी पुतळीता.जि.जालना  जिल्हा समन्वयक सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने