मालपुर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंती अभिवाद




(प्रभाकर आडगाळे) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे धनगर समाज बांधवांनी कोविड 19 च्या नियम पाळत पुर्णाकृती पुतळा राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात श्रीफळ वाहुन पूजाविधी करुन सरपंच श्री.मच्छिंद्र शिंदे समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक पोपट बळीराम बागुल,पत्रकार प्रभाकर आडगाळे,पत्रकार रविद्र राजपूत,भलकार S.S.राजेश बागुल,कुणाल बागुल,राजपत्रीत आधिकारी मगन मोतीराम बागुल,छगनदादा बागुल,भटू बागुल,ग्रामपंचायत सदस्य,संतोष भाऊ कोळी,अॅडव्होकेट,रामकृष्ण धनगर,रमेश बागुल,समाधान धनगर,आदि उपस्थित होते.खरेसमाज कार्य रमेश भाऊ बागुल यांनी पुतळा व आजुबाजुचा परिसर स्वच्छ करुन समाजसेवा केली.जागा सुशोभित वातावरण केले. राजमाता अहिल्यादेवींच्या 296वीं जयंती व  त्यांच्या कार्याचा छोटा लेखा जोखा.मुगलांनी उध्वस्त केलेले हिंदुची मंदिरे मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांनी पुन्हा बांधली.व भारतीय संस्कृतीचे रक्षण केले.समाजसुधारणा करुन.मुलींना शिक्षण,महिलांना सैनिकी शिक्षण,हुंडाबंदी,दारु बंदी,झाडे तोडण्यास बंदी,अशा योजना राबविल्या.धर्मशाळा,घाट आणि पायविहिर आजही जिवंत आहेत.अहिल्यादेवी बद्दल आचार्य विनोबा भावे म्हणतात कि अन्य प्रांतीयांकडुन आम्ही अहिल्यादेवीची स्तुती एकली शस्रबळाने दुनियेला जिंकणारे अनेक आहेत.परंतु प्रेमाने धर्मशक्तीने भारतातल्या सर्व प्रांतांना जिंकणार्‍या अहिल्यादेवी या एकमेव स्री आहेत.अहिल्याबाईच्या कार्यकौतुकावर मल्हाररावांचा प्रचंड विश्वास होता.मल्हार रावांच्या मार्गदर्शन व आर्शिवादाने अहिल्याबाई हळुहळु उत्तम प्रशासक व सैन्य बांधनी कामात पारंगत झाल्या अहिल्याबाईंनी स्व;त सुरुवातीला 17पासुन ते 170स्त्रीयांना सैनिक शिक्षण दिले.महिलांना सक्षम केले.स्री म्हणजे साक्षात दुर्गाच आहे.अशा शुर विरांगणी तेजस्वी राजमातेला त्रिवार वंदन करुण भावपुर्ण आभिवादन करुन माझा लेखनीला पुर्ण विराम देतो.              
 *जय अहिल्या-------जय मल्हार------*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने