धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यतील विखरण येथील रहिवाशी असलेले शिक्षक श्री चंद्रशेखर सुपडू पाटील (सी एस पाटील) यांच्या मातोश्री या विखरण गावाच्या माजी ग्रामपंचायत सदस्या कै. शांताबाई सुपडू पाटील यांचे दिनांक 24 मार्च 2021 रोजी नाशिक येथे दुःखत निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आपल्या आईच्या इच्छेनुसार आपल्या गावाला करावी म्हणून त्यांची अंत्ययात्रा या कोरोनाच्या काळात गावाला करण्यात आली. आणि त्यांच्या अस्तिचे विसर्जन मात्र कोणत्याही नदीत न करता सी एस पाटील सर यांनी धार्मिक परंपरेला तिलांजली देत आपल्या शेताच्या बांधावर खड्डा खोदून केली .आणि त्याच जागेवर एक वृक्ष लावत अस्तिविसर्जन करण्यात आल्या. ज्या मातीत जन्मले आयुष्यभर त्याच मातीत काबाड कष्ट केले आणि त्याच मातीत विसजन केले त्यामुळे शिक्षक पाटील सर यांनी आपल्या आईला खरी श्रद्धांजली वाहिली आणि त्या झाडाच्या रूपाने दीर्घकाळ आपली स्मृतीत ठेवण्याचे काम केले.यामुळे नदीच्या पाण्याचे प्रदूषण थांबलं आणि वृक्षारोपणामुळे पर्यावर्णाचे संवर्धन झाले आशा प्रकारचा आगळा वेगळा संदेश समाजात देण्याचे मोठे काम करणारे शिक्षक हे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कासा येथील पूज्य आचार्य भिसे मा. व उच्च माध्यमिक विद्यलयात ज्ञानदानाचे पवित्र काम करत आहेत .हे काम करत असतांना त्यांच्या हातून अनेक आदिवासी ,गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचे उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपत असतात. तशीच सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम चंद्रशेखर सर यांनी केले .या प्रसंगी श्री दिलीप भाईदास पाटील अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा धुळे,प्रवीण जगन्नाथ पाटील माजी सरपंच, श्री तुषार मोहन पाटील, श्री दशरथ पाटील अन्य ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सी एस पाटील म्हणाले की दररोज शेकडो लोक आपल्या नातेवाईकांच्या अस्ति नदीत विसर्जन करायला जात असतात तर आपण कल्पना करा की नदीत वर्षातून किती अस्ति होतील म्हणून मी हा निर्णय घेतला असे आमच्या पत्रकारांशी बोलतांना म्हणाले
Tags
news
