प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:शिखर शिंगणापुर घाटात ३१ मार्च रोजी टाकण्यात आलेल्या दरोड्यां मधील आरोपीस नातेपुते पोलिसांनी ४८ तासात जेरबंद करण्यास यश आल आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,दि.३१/०३/२०२१ रोजी नातेपुते येथील व्यापारी अंबादास उत्तम पंलगे यांचे महिन्द्रा पिकअप एम.एच ४२ एम ७१४६ या गाडीमध्ये ४० शेळयामेंढया भरुन केरळ येथील व्यापाऱ्यास देण्यासाठी शिंगणापूर घाटातून निघाले होते. शिंगणापुर मार्गे जात असताना अज्ञात तीन मोटार सायकल व त्या वरील सहा इमसानी वरील गाडीचा पाठलाग करुन रात्री ११ वाजण्याच्या सुमारास शिखर शिंगणापूर घाटातील तिस-या वळणाच्या टप्यावर पिकअप गाडीच्या समोर मोटार सायकल आडवी लावुन पिकअपची चावी काढुन बापुराव महादेव डोंबाळे व हणमत शेषेराव बनसोडे यांना पुढे जाण्यास आडथळा करुन त्यांना पैसाची मागणी करत हाताने लाथाबुक्काने तोंडावर ओठावर मारहाण करुन जखमी केले.
यावेळी बापुराव डोंबाळे यांचेजवळचे पाच हजार रुपये आणि या दोघांचे दोन मोबाईल दमदाटी करून जबरदस्तीने काढुन घेवुन गेले.या घडलेल्या प्रकारा बाबत गाडी चालक बापुराव महादेव डोंबाळे रा.नातेपुते यांनी नातेपुते पोलीस ठाण्या मध्ये याबाबत सदर तक्रार घेत नातेपुते पोलिसांनी सहा अज्ञात इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला.पोलिसांनी शिंगाणापुर घाट व कोथळे घाट याठिकाणी रात्रीच्या वेळी वाहतुकीचा तुरळक असल्यामुळे सदर ठिकाणी यापुर्वी देखील अशा प्रकराचे घटना घडलेल्या आहेत.सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु,स्थानिक गुन्हे शाखा सोलापु, पो.नि सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचा तपास करण्यासाठी गुन्हयातील चोरीस गेलेले पाच हजार रोख रक्कम व सहा हजार रुपयेचे दोन मोबाईल व गुन्हयात वापरलेले तीन बिगर नंबरच्या मोटर सायकली व अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी पोलीस पथके तयार करुन गुन्हयाच्या तपासकामी रवाना केले.
तपास करीत असताना आरोपी सोमनाथ उर्फ सागर अनिल बनसोडे,अक्षय बबन बल्लाळ रा.बाजार तळ सदाशिवनगर ता माळशिरस असे दोघेजण बिगर नंबरची शाईन मोटर सायकलवरुन फिरताना त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे आधिक चौकशी केली असता त्याने व इतर आरोपी अभिमान अर्जुन खिलारे रा मोरोची ता.माळशिरस,धनाजी साधु दडस रा. मारकडवाडी ता.माळशिरस,गणेश बाळासो जाधव रा.जाधववाडी ता.माळशिरस,चैतन्य हणुंमत झेंडे रा.मोरोची ता.माळशिरस यांचे सहाय्याने गुन्हा केल्याचे सांगितले त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
तसेच अभिमान अर्जुन खिलारे यांचेविरुध्द आटपाटी जि. सांगली, दहिवडी जि सातारा,अहमदनगर माळशिरस याठिकाणी मोटार सायकल चोरुन त्यांचा वापर असे गुन्हे आहेत.तसेच सदर आरोपीकडून नातेपुते पोलीस ठाणे हददीतुन चोरीस गेलेल्या दोन मोटार सायकल मिळुन आलेल्या आहेत. त्यासंबधी पोलीस ठाणेस गुन्हे दाखल आहेत.सदर गुन्हयातील इतर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी धनाजी साधु दडस मौजे कणकवली पोलीस स्टेशन जि.सिधुंदुर्ग येथील जबरी चोरीच्या दाखल गुन्हयात तो सन २०१५ पासुन फरारी होता.त्यास वरील दाखल गुन्हयाच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे.गुन्हयातील चोरीस गेलेली रक्कम पाच हजार व दोन मोबाईल सहा हजार रुपये व गुन्हयात वापरलेल्या तीन मोटर सायकल व इतर दोन मोटार सायकल असे पाच मोटर सायकल असे एकुण १,४०००० रु चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहेत.
सदरची कामगिरी नातेपुते पोलीस ठाणेचे सहा.पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर,पोहे गडदे,पोना मसाजी थोरात,पो.कॉ अजित कडाळे,पो.कॉ अमित जाधव,पो.कॉ विशाल घाडगे,पो.ना राजेश लांडगे,पो.ना सचिन भोसले,पो.ना नवनाथ माने,चालक पोलीस शिपाई राहुल भोसले,पोना सुर्यवंशी,पो.कॅ धनाजी मुटकुळे,पो.कॉ जानकर,पो.कॅ कापसे,पो.ना महेश पाटील,पो.ना बबलू गाडे यांनी केली आहे.
Tags
news
