येवला येथे जनता विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न.




                                               नाशिक शांताराम दुनबळे.                                                      येवला-:येवला येथे जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती परीक्षा कोरोना नियमांची अंमलबजावणी करत संपन्न झाली 
        आज दिनांक६/४/२०२१ मंगळवार या दिवशी सदर परीक्षेचे जनता विद्यालय येवला केंद्र क्रमांक ३१०२ येथे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण येवला तालुक्यातुन २९२ एवढे विद्यार्थी_सहभागी झाले होते शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते सदर परीक्षा कोरोना १९ चा प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे आसन व्यवस्था सामाजिक अंतर राखून आसन व्यवस्था करण्यात आली होती केंद्र संचालक तथा प्राचार्य श्री दादासाहेब मामुडे त्यांनी परीक्षेचे नियोजन अतिशय प्रभावीपणे केले तत्पूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे तापमापी ने तापमान व अक्सिजन मोजून व सॅनिटायझर चा वापर करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला सदर परीक्षे वेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले त्यामध्ये श्री कुलकर्णी वाय बी, मार्तंड आर पी, पवार समाधान, जव्हार देवरे, नितीन पवार, गांगुर्डे डी एम, पवार एस ए यांनी परीक्षेचे उतम नियोजन केले यासाठी केंद्रप्रमुख श्री दादासाहेब मामुडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पोलीस टाईम पत्रकार संतोष गायकवाड व शशिकांत जगताप येवला तालुका  सामाजिक कार्यकर्ते यांनी परीक्षा सुरू असताना भेट देऊन कामकाजाचे व परीक्षांचा नियोजनाचे समाधान व्यक्त केले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने