तालुक्यातील वणावल जातोडा रस्त्यावर रुमित केमिकल फॅक्टरी जवळ वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरवर तहसीलदारांची कार्यवाही.





तालुक्यातील वणावल जातोडा रस्त्यावर अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर स्वतः तहसीलदार यांनी सकाळी 7 वाजेच्या सुमारास पकडले असून  दंडात्मक कार्यवाहीसाठी प्रांताधिकारी कार्यालयात जमा केले सदर कार्यवाही एका गोपनीय माहिती वरून करण्यात आली.
        तालुक्यातील वणावल व जातोडा शिवारातील एका नाल्यातून वाळूचा अवैध उपसा करून जातोडा रस्त्याने ट्रॅक्टर ने अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार आबा महाजन यांना मिळल्यावरून तात्काळ पथकासह वणावल जातोडा रस्त्यावर रुमित केमिकल फॅक्टरी जवळ सकाळी पोहचले.त्यांना सकाळी 7:00 वाजेच्या सुमारास सदर ट्रक्टर वाळूचा जातांना आढळून आल्याने थांबवून चौकशी केली असता सदर ट्रॅक्टरमधून अवैध वाळू उपसा व वाहतुक करतांना आढळून आले.सदर ट्रक्टर ताब्यात घेत तहसिलदारांनी प्रांताधिकारी कार्यालयात दंडात्मक कार्यावाहीसाठी जमा केले.
    सदर कार्यवाही तहसीलदार आबा महाजन मंडळ अधिकारी पी.पी.ढोले,प्रभाकर गावित,अव्वल कारकून विजय पाटील तलाठी बी.आर.सानप,एन.एस.पटेल,वाहन चालक सतीश पाटोळे यांच्या पथकाने केली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने