पळसदेव जवळ झाला भीषण अपघात, 2 जण जागीच ठार



 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 

पुणे -   इंदापूर तालुक्यातील पळसदेव जवळ काळेवाडी हद्दीत दुचाकी आणि टाटा टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले आहेत.

आज रविवार दिनांक 4 मार्च रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील पुणे- सोलापूर हायवेवर असणाऱ्या पळसदेव हद्दीतील काळेवाडी या ठिकाणी सर्विस रोड वरती हिरो होंडा डिलक्स दुचाकी (नं. MH-12- DN-2791) वरील दोघेजण प्रवास करत पुणे कडून सोलापूर कडे सर्विस रोडने भरधाव वेगात जात असताना समोरून येणाऱ्या टाटा टेम्पो (नं.MH-42-AQ-6006) यांची समोरा समोर जोरदार धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे जागीच गंभीर जखमी होऊन ठार झाले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने