खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक पिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू




  प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 
पुणे:बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याने खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक प्राशन केलेल्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. पोपट विष्णू दराडे (वय 45, रा. अकोले, ता. इंदापूर जि पुणे) असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

कर्तव्य बजावून घरी गेल्यानंतर दराडे हे आराम करत होते. त्यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता. खोकल्याचे औषध समजून त्यांनी शेतात फवारण्याचे किटकनाशक प्राशन केले. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांना त्रास होवू लागला. त्यांनी घरच्यांना हे औषध पिल्याचे सांगितले. कुटुंबातील लोकांनी तात्काळ त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेली 24 वर्षे ते पोलिस सेवेत होते. पुणे शहर, देहू रोड, इंदापूर, बारामती शहर आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी प्रतिक्रीया दिली असून ते म्हणाले, की खोकल्याचे औषध समजून किटकनाशक प्यायल्याने दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने