मलकापूर:-राष्ट्रीय बजरंग दल कडून मास्क व शनि टायझर चे वितरण




मलकापूर - महाराष्ट्र राज्यात दुसरी लाट आली असून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कोरोणा वेगाने पसरत आहे. यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत मात्र कोरोणा नियमांचे पालन नागरिकांकडून होत नसल्यामुळे या  रोगाच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. व मानवी जीवन धोक्यात आले आहे. पुन्हा एकदा राज्य लॉक डाऊन च्या उंबरठ्यावर आहे. आणि आपल्याला लॉक डाऊन नको असेल  नियमांचे पालन तंतोतंत करा अशा सूचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. याबाबत अधिक जनजागृती करण्यासाठी सामाजिक जाणिवेचे बांधिलकी ठेवून मलकापूर येथील राष्ट्रीय बजरंग दल यांच्याकडून कोरोना  बाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यात आली व शासन नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले .शिवाय गरजू लोकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप देखील करण्यात आले.
कोरोणाची दुसरी लाट  आपल्या राज्यात परत आली आहे त्यात शासनाने घातलेले निर्बंध  जनतेने पाळावे त्या अनुषगांने आज मलकापूर बस स्थानकात राष्ट्रीय बजरंग  दल  जिल्हा संपर्कप्रमुख जीवनसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली  मास्क व सॅनिटायझर चे वाटप करण्यात आले. त्या वेळी राष्ट्रीय बजरंग दल पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने