कल्पेश राजपूत, शहादा
शहादा :- महाराष्ट्र राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गुजरात सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे शहादा व नंदुरबार कडून येणारा वाका चार रस्त्यावर प्रवाश्यांची तपासणी करूनच गुजरात मध्ये प्रवेश दिला जात आहे. गुजरात व महाराष्ट्रातील खाजगी वाहनासह, बसची देखील तपासणी केली जात आहे.
महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रत्येक गाडीची तपासणी केली जात आहे. ज्या प्रवाशांकडे करोना चाचणीचा अहवाल नकारात्मक असेल अशाच प्रवाशांना गुजरातमध्ये प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. एकीकडे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे, पण दुसरीकडे गुजरातमधून महाराष्ट्रात येणारे मात्र करोना नियमांचे पालन करत नसल्याचे पाहायला मिळत आहे, असे सांगितले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात करोनाचा मोठय़ा प्रमाणात उद्रेक झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची गुजरात सीमेवर तपासणी केली जात असून. कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी केल्याशिवाय कुणालाही गुजरात राज्यात प्रवेश देण्यात येत नाही
*
Tags
news
