नाशिक शांताराम दुनबळे .
नाशिक-: स्त्री ला तुडवले तर नागीण,डिवचले तर वाघीण,कडाडली तर वीज असते,तान्ह्या बाळाची निज असते,संस्काराची खाण असते असे प्रतिपादन संगीता चव्हाण यांनी केले
दिंडोरी येथील जिल्हा परिषद शाळा क्र.१ मध्ये महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना चव्हाण बोलत होत्या.या वेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रचना ताई जाधव,सामाजिक कार्यकर्ते अविनाश जाधव,पहिल्या उप नगराध्यक्ष आशाताई कराटे,मुख्याध्यापिका सुनंदा सोनवणे,प्रसिद्ध कोरियोग्राफर योगिनी शीतान,दिंडोरी पंचायत समिती चे विशेषतज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, दगडू खैरनार, गणेश बोरसे,अप्पासाहेब घुले आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांचा पुस्तक गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी कोरियोग्राफर योगिनी शीतान यांनी मार्गदर्शन केले. स्त्रीयांनी स्वतः ला कमी न समजता,वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करावे असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन दगडू खैरनार यांनी तर आभार गणेश बोरसे व अप्पासाहेब घुले यांनी मानले.
या प्रसंगी मंगला पवार,बाबूबाई बागुल,सुनीता निकम, सुशीला बिरारी,इंदिरा भागवत,लीलावती थोरात,सुनीता सोनवणे,संगीता चव्हाण, सुनीता चव्हाण,सुरेखा शिरोडे, नीलिमा जोशी,प्रभावती राऊत,वैशाली पालवे,रोहिणी घोडेराव,कल्पना वाघ,सरला पाटोळे, दीपाली थोरात,अनिता बेलसरे,अर्चना पवार,मनीषा भामरे,मंगल चौधरी,प्रतिभा वाघ,अरुण रोडे आदी शिक्षक उपस्थित होते .
Tags
news
