(श्री. प्रभाकर आडगाळे.)मालपुर ता.शिंदखेडा जि.धुळे
येथील आरोग्य कर्मचारी तंबाखु जन्य पदार्थ सेवन करतांना व खिशात बाळगतांना आढळुन आला त्याला पत्रकाराने विचारले असता.तो म्हणतो बातमी छापा माझी पेपरला न्युजला द्या माझे काही होणार नाही .त्याच्या अश्या वागणुकिवरुन असे कळते की शासनाचे नियम लवचीक आहेत की?त्याला शह देणारे मालपुर प्रभारी वैद्य अधिकारी असा प्रश्न गावकर्यांना सतावत
आहेत.सार्वजनिक आरोग्य विभाग धुळे.यावर कीतपत कारवाई करते.या कडे मालपुर व परिसरातील जनतेचे लक्ष लागुन आहे.कायदे होतात फक्त नी फक्त कागदो पत्रीच प्रतेक्षात मात्र कारवाई होत नाही.असा जनतेचा समज आहे. सर्व आरोग्य संस्थेच्या प्रवेश द्वारावर तंबाखु नियंत्रण कायद्या प्रमाणे 60बाय 30से.मी.फलकावर ध्रुमपानास बंदी याबाबत सुचना देण्यात आली असुन सेवन करणारा आढळुन आल्यास 200रु,दंड आकारण्यात येईल मात्र असे असुन मालपुर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी (शिपाई) हा विमल खाताना आढळुन आला.व खिशात विमलच्या पुड्या आढळुन आले.मालपुर आरोग्य संस्थेचे तंबाखु नियंत्रन समितीचे दुर्लक्षच आहे असे दीसते.तसेच मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ईमारतीत जे फलक लावले आहेत त्यांची दुरावस्था पाहुनच समजते की तंबाखु नियंत्रन समिती कितपत कार्यरत आहे.सुचनाफलकाची अशी दशा उघड्या डोळ्यांनी पाहणारे प्रभारी वैद्य अधिकारी हितेंद्र पाटील.यांची पितामभिष्माची भुमिका दिसते. किमान राज्यात साथ रोग पसरत असताना आरोग्य विभागाने तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करत नियम पाळले पाहिजेत मात्र येथे तर दिव्या खालीच अंधार अशी परिस्थिती आहे. तंबाखु मुक्त आरोग्य संस्था सार्वजनिक विभाग धुळे याकडे लक्ष देतील काय?या कडे मालपुरकर जनतेचे लक्ष लागुन आहे.तंबाखुजन्य पदार्थ सेवन करणारा व खिशात बाळगनार्यावर काय कारवाई होते हेच खरे.कार्य वाही न झाल्यास आरोग्य केंद्राला टाळे ठोकुन आंदोलन करण्याचा ईशारा गावकर्यांनी दीला आहे.
Tags
news


