शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज दिनांक 1 मार्च रोजी 1 ते 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आले राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त भडणे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तर्फे आरोग्य सेविका कविता बोरसे यांच्या उपस्थितीत 1 ते 19 वयोगटातील मुला-मुलींना निशुल्क जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भडणे येथील लोकनियुक्त सरपंच गिरीश वामनराव,देसले व भडणे येतील पोलीस पाटील युवराज माळी आरोग्य सेविका कविता बोरसे यांच्या उपस्थितीत लहान बालकांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक मोरे सामाजिक कार्यकर्ते मुकेश देसले बुरा खरकार शिक्षक अंगणवाडी मदतनीस व आशा वर्कर यावेळी उपस्थित होते
Tags
news
