*शिरपूर तहसील कार्यालयात रास्त धान्य दुकानदार तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची विडीओ कॉन्फरंसदवारे संवाद.*
शिरपूर ता. (प्रतिनिधी) विविध रोजगार मुळे स्थलांतरित कामगार व मजूर आणि ग्राहकाना शासनाने *एक देश एक रेशन कार्ड* या योजने संबंधी ऑनलाईन केंद्रीय सचिव अन्न व सुरक्षा सुधांशु पांडे तसेच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संवरक्षण विभागाचे सचिव विलास पाटील यांनी व्हिडिओ प्रशिक्षण दिले.तसेच याव्हिडिओ प्रशिक्षणास सर्व जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी हे उपस्थित होत तरी योजनेनुसार पात्र लाभाध्याला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातील कोणत्याही रास्त भावाच्या दुकानातून त्याच्याकडे असलेल्या रेशन कार्डचा वापर करून अन्नधान्य घेता येणार आहे बायोमेट्रिक अथवा आधार वैधतेनंतर अन्नधान्य उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
*काय आहे 'एक देश एक रेशन कार्ड योजना?*
वन नेशन एक देश एक रेशन काई ही केंद्र सरकारची महत्त्वाकाक्षी योजना आहे.ही योजना लागू झाल्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थी कोणत्या ही राज्यातल्या कोणत्याही रास्त भाव दुकानातून धान्य घेऊ शकतो. महाराष्ट्रात कामगार म्हणून आला आहे परप्रांतीय कामगार , मजुर यास ही योजना लागू झाल्यानंतर त्याला महाराष्ट्रातल्या कोणत्याही रेशन दुकानातून ऑनलाईन आधार प्रमाणीकरण करुन रेशन मिळू शकणार आहे.या योजनेनुसार लाभार्थ्यांची ओळख ही त्यांच्या आधार कार्डवर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पाइट ऑफ सेल डिव्हाइसदवारे केली जाऊ शकते.कारण यामध्ये लाभार्थ्यांची माहिती फिड करण्यात आली आहे.
*दहा नंबरचा रेशन कार्ड क्रमांक*
केंद्र सरकार राज्यांना दहा अंकाचे रेशन कार्ड कमांक देइल. या क्रमांकाच्या आधीचे दोन कमांक राज्याचे कोड असतील आणि त्यानंतरचे दोन नंबर रेशन कार्ड कमांक असेल,
*भ्रष्टाचाराला आळा बसणार ?*
या योजनेमुळे भष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा सरकारकडून व्यक्त करण्यात येत आहे. तर कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसन्या ठिकाणी जाणाऱ्या कामगारानाही अनुदानित धान्यापासून वंचित राहावं लागणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आले आहे
*जुन्या रेशन कार्डचे काय होणार?*
एक देश एक रेशन कार्ड योजनेला सुरुवात झाल्यानंतरही जुने रेशन काई सुरुच राहणार असल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ग्राहकांची माहिती अपडेट करण्यात येईल, त्या नंतर पुर्ण देशात ते लागू होईल रेशन कार्डधारकांना गहू आणि तांदळ स्वस्त दरात मिळते.तांदूळ तीन रुपये किलो तर गहू दोन रूपये किलो दराने मिळतो वरील योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच या प्रशिक्षना नंतर योजनेचा लाभ स्थलातरित नागरिकांना मिळवून देण्यासाठी अन्न सुरक्षा लाभार्थ्याने कुटुंबांचे आधार लिकिंग तसेच शिधापत्रिका पडताळणीबाबत मार्गदर्शन केले याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन पुरवठा निरीक्षण अधिकारी मायानंद भामरे तसेच पुरवठा निरीक्षक अपर्णा वडूरकर,पुरवठा अ.का.महेश वाडीले, दिपाली दाभाडे तसेच तालुक्यातील सर्व रास्त भाव दुकानदार उपस्थित होते
Tags
news
