निफाड तालुक्यातील ९ रस्त्यांना तर येवला तालुक्यातील २६ रस्त्यानां इतर जिल्हा मार्गाचा दर्जा



नाशिक शांताराम दुनबळे. 
नाशिक-:येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील एकूण ९ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची दर्जोन्नती झाल्यामुळे या रस्त्यांचे लवकरच बळकटीकरण होणार असल्याने ग्रामीण भागातील शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्यांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला विधानसभा मतदारसंघातील निफाड तालुक्यातील कुंभारी ब्राम्हणगाव वनसगाव थेटाळे कोटमगाव पिंपळद या १५.६० किलोमीटर ग्रामीण मार्ग ९४, ४, १०५ या  रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २५९ क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच टाकळी विंचूर खडक माळेगाव सावरगाव खडक ओझर चांदवड तालुका हद्दीपर्यंत एकूण १६.३० किलोमीटर ग्रामीण मार्ग ११०, ३१, २ या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २६० क्रमांक, डोंगरगाव देवगाव कानळद ते चास तालुका हद्दीपर्यंत एकूण १६.४० किलोमीटर ग्रामीण मार्ग १३, २२१, १३६ या रस्त्यांना २६१ क्रमांक, रुई ते नांदगाव बोकडदरे ते ग्रामीण मार्ग ५६ या एकूण १६.५० किलोमीटर ग्रामीण मार्ग १२ या रस्त्याला २६२ क्रमांक, डोंगरगाव गोळेगाव गोंदेगाव ते जऊळके तालुका हद्द  या एकूण ११.५० किलोमीटर ग्रामीण मार्ग १०, २४७ या रस्त्यांना २६३ क्रमांक प्राप्त झाला आहे.

त्याचबरोबर भरवस फाटा ते निमगाव वाकडा या एकूण १४.२० किलोमीटर ग्रामीण मार्ग २८,५८,११ या रस्त्यांना २६४ क्रमांक, देवगाव भरवस फाटा डोंगर बोकडदरे या एकूण १५.४० किलोमीटर ग्रामीण मार्ग १६१,२४६,१६ या रस्त्यांना २६५ क्रमांक, इतर जिल्हा मार्ग १८० (धारणगाव वीर) खेडलेझुंगे बोरमाथा ते रुई या एकूण १३ किलोमीटर ग्रामीण मार्ग ६०,५९ या रस्त्यांना २६६ क्रमांक तर नांदूर मध्यमेश्वर धारणगाव (खडक) धरणगाव विहीर धानोरे ते देवगाव या एकूण ११.३० किलोमीटर ग्रामीण मार्ग १८, १४५ या रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग २६७ क्रमांक प्राप्त झाला आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील हे रस्ते इतर जिल्हा मार्गात दर्जोन्नत झाल्यामुळे या रस्त्याच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे.
 येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील एकूण २६ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्ग तर एका इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यात आले आहे. सदर रस्त्यांची दर्जोन्नती झाल्यामुळे या रस्त्यांचे लवकरच बळकटीकरण होणार असल्याने ग्रामीण भागातील शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचविण्याकरिता तसेच दळणवळणाच्या दृष्टीने या रस्त्यांचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील पाटोदा सातारे एरंडगाव रवंदा (अ.नगर जिल्हा) हद्द  या इतर जिल्हा मार्ग १९१, ग्रामीण मार्ग १६ व ४३ या एकूण १५.५०० किलोमीटर रस्त्याला प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती मिळाली असून या रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्ग १७८ हा क्रमांक प्राप्त झाला आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाला आहे.लवकरच या रस्त्याच्या सुधारणेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी उपलब्ध होणार असल्याने परिसरातील नागरिकांना दळणवळणासाठी या रस्त्याचा फायदा होणार आहे.

 त्याचप्रमाणे येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील २६ ग्रामीण मार्ग रस्त्यांना इतर जिल्हा मार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने