राज्यस्तरीय शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धेत नाशिक करांचा राज्यात डंका







नाशिक शांताराम दुनबळे 
नाशिक -: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत नाशिककरांनी बाजी मारली.

शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग, उपक्रम, नवा विचार निर्माण करून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ मनोरंजक करून वेगळी वाट निर्माण करणाऱ्या अधिकारी शिक्षकांसाठी नवोपक्रम स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते.सन २०१९-२० मध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या  मात्र कोरोना-19 मुळे स्थगित करण्यात आल्या होत्या .सन २०२०-२१मध्ये आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल व बक्षीस समारंभ नुकताच ऑनलाईन आयोजित करण्यात आला.
. या समारंभासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे संचालक मा. दिनकर टेमकर , सहसंचालक ,मा.डॉ. विलास पाटील, उपसंचालक मान. विकास गरड साहेब, संशोधन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. गीतांजली बोरुडे , 
 श्री. अमोल शिंगारे ,विषय शिक्षक संशोधन विभाग या मान्यवरांच्या हस्ते ऑनलाईन सोहळा पार पडला. या स्पर्धेत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अधिकारी गटात नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ज्येष्ठ अधिव्याख्याता रत्नप्रभा भालेराव , प्राथमिक शिक्षक गटात श्री.प्रकाश चव्हाण प्राथमिक शिक्षक करंजवण ,माध्यमिक गटात के आर टी विद्यालय वणी येथील,प्रवीण पानपाटिल , मधुकर गायधर तर विषय सहाय्यक गटात श्री. विजय अवचार, जिल्हा समन्वयक आणि २०२०-२१ मध्ये अधिकारी गटात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे जेष्ठ अधिव्याख्याता योगेश सोनवणे, अधिव्याख्याता डॉ संगीता महाजन,दिंडोरी चे गट शिक्षण अधिकारी भास्कर कनोज ,
 प्राथमिक गटात नलिनी आहिरे  तर माध्यमिक शिक्षक गटात अर्चना आरोटे यांनी विजेतेपद पटकावले. सर्व विजेत्यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ रत्नप्रभा भालेराव,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ वैशाली वीर,प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर,शिक्षण सभापती सुनंदा दराडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने