नाशिकमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी लॉकडाऊन करण्याचे स्पष्ट संकेत




 नाशिक शांताराम दुनबळे 

नाशिक - जिल्ह्याची कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही 645 इतकी आहे. त्यामुळे आता शहरा सह जिल्ह्यात लोकडाऊन करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत जिल्हा प्रशासन अतिशय गांभीर्याने विचार करत आहे.

रुग्ण संख्या वाढत चालली आहे आणि त्याचबरोबर लोकांकडून कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. व्यक्तिगत कारवाया करून या गोष्टींना आळा घालणे अत्यंत अवघड असल्याने अशीच परिस्थिती सुरू राहिली तर निश्चितच काही निर्बंधांचा विचार करावा लागेल.

*दंडाचा परिणाम नाही*

आजपर्यंत करोडो रुपये दंड केले आहेत परंतु त्याने काहीही फरक पडलेला नाही. आपण कोरोनाचे संकट वाढवून लॉक डाऊनचे संकट ओढवून घेत आहोत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने निर्बंध कठोर करणे हा एक पर्याय आहे किंवा थेट लॉक डाऊन करणे हे दोन पर्याय आहेत. परिस्थिती सुधारते की बिघडते यावर ते अवलंबून आहे, असे मांढरे यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने