सावळदे येथील आठवडे बाजाराला वाढता प्रतिसाद!





शिरपुर(प्रतिनिधी)* : *येथे दर शनिवारी आठवडे बाजार भरतो. नवनिर्वाचित सरपंच अनिल दाेरीक, उपसरपंच सचिन राजपूत  तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडे ग्रामस्थांची गावात आठवडे बाजार भरावा अशी मागणी केली हाेती*. त्यानुसार सरपंच, उपसरपंच यांनी निर्णय घेत गेल्या चार आठवडा भरापासुन दर शनिवारी गावात बाजार भरविला जात आहे.    
      बाजारात भाजीपाला, फळे, कपडे, मसाला, सुकामेवा, अन्नधान्य, कटलरी यांच्यासह संसारपयाेगी साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. सावळदे व पंचक्रोशीतील कुरखळी, पिंप्री, जैतपुर, आढे, खर्दे, उंटावद, बाभुळदे, गिधाडे, साकवद, जाताेडे, वर्षी, दभाषी यासह विविध गावांचा संपर्क येताे. तर निम्स कॅम्पसचा देखील कर्मचारी वर्गाचा संपर्क येताे. या दृष्टीकोनातुन शिरपुर येथे न जाता सावळदे गावात आठवड्यातुन एकदा बाजार भरावा तसेच सर्वांचा वेळ वाचावा गावातील शेतकरी, कष्टकरी, पशुपालक, युवक यांना राेजगार उपलब्ध व्हावा. या हेतुने बाजाराला सुरूवात केली आणि जनतेने आठवडे बाजाराला उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे.     
        *पंचक्रोशीतील गावकरी बांधवांनी देखील सावळदे येथील स्वस्त व रास्त भाव तसेच ताजा व फ्रेश माल असलेल्याआठवडे बाजारात खरेदीचा लाभ घ्यावा. व ही परंपरा कायम करावी असे आवाहन उपसरपंच सचिन पदमसिंग जाधव यांनी केले आहे*. 


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने