धुळे तेली समाज पंच मंडळाच्या वतीने तैलिक युवा महासभा पदाधिकारींचा सत्कार



धुळे- धळे ग.नं. २, तेली भवन येथे रविवार दि. २१ मार्च २०२१ रोजी संध्याकाळी ५,३० वाजता धुळे तेली समाज पंच मंडळाचे अध्यक्ष, प्रथम महापौर भगवान बापूजी करनकाळ यांच्या व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभा प्रदेश महासचिव पदी नरेंद्र बारकू चौधरी यांची तर  जिल्हा अध्यक्ष पदी कैलास काळू चौधरी , विभागीय उपाध्यक्ष तुषार चौधरी, भारतीय पत्रकार महासंघ धुळे जिल्हा संघटक रमेश करनकाळ  व  चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष गिरीश चौधरी यांच्या स्तुत्य निवडीबद्दल पंच मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भगवान बापूजी करनकाळ होते कार्यक्रमाची सुरुवात संत श्रेष्ठ संंताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व पुजन सत्कारार्थी यांच्या हस्ते करुन करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभा प्रदेश महासचिव नरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदासजी तडस, महासचिव डॉ. भुषणजी कर्डिले, राज्य अध्यक्ष अशोक काका व्यवहारे, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, विभागीय अध्यक्ष आर.टी. आण्णा चौधरी, राज्य युवा अध्यक्ष संदीप भैय्या क्षीरसागर यांनी राज्य पातळीवरील पद दिल्याने  जिल्हावर फार मोठी जबाबदारी व विश्वास टाकलाय  तर नियुक्तीचा पंच मंडळाने सत्कार करणे म्हणजे धुळे जिल्ह्यातील समाजाच्या मातृ संस्थेने केलेला गौरव आहे, त्यामुळे आमची समाजाप्रती विकास व संघटनची जबाबदारी वाढली आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भगवान करनकाळ म्हणाले की, सर्व समाज एकजूट होवून ताकद दाखवली पाहिजे, युवकांनी पुढे येवून वेगवेगळ्या क्षेत्रात नेतृत्व निर्माण केले पाहिजे त्याकरिता पंच मंडळ व आम्ही सोबत आहोत,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे  राज्य पातळीवरील मोठे संघटन असून समाजाचे विद्यमान खासदार,आमदार, व अभ्यासू लोक याचे नेतृत्व करतात.  युवा महासचिव पद धुळे जिल्हाला मिळाल्याने राज्य पातळीवर समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होवू शकते. या कार्यक्रमास भाऊसाहेब चौधरी, अनिल अहिरराव, किशोर थोरात, हिरूआप्पाचौधरी,  सुरेश चौधरी, चंद्रकांत चौधरी , बबनराव चौधरी, किरण बागुल, निलेश महाले, भटु मन्साराम चौधरी, सुरेश चौधरी, कल्पेश चौधरी, महेश चौधरी, महेश थोरात, किशोर थोरात, विनोद चौधरी, जयवंत चौधरी, भिकन चौधरी जिल्हा अध्यक्ष गोविंद चौधरी, सजन चौधरी,महेश बाविस्कर, गणेश चौधरी, कल्पेश चौधरी आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश चौधरी तर आभार संदीप चौधरी यांनी मानले,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने