शिरपूर - शिरपूर तालुक्यात पोषण आहारात आर्थिक शोषण होत असून निकृष्ट दर्जाचे खाद्य पुरवले जात असल्याचा आरोप जिल्हा परीषद जनरल बोर्डाच्या मिटींगमध्ये जि प सदस्य यांनी केला असून ठेकेदार यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तालुक्यासाठी दर महिन्यात शालेय पोषण आहार वाटप होत असतो. परंतु शालेय पोषण आहार मध्ये जी मुंगडाळ या वेळी वाटप करण्यात आली ती मुंगडाळ अतिशय निकृष्ट दर्जाची आढळून आली. त्या मुंग डाळची पॅकिंग तारीख नाही,ठेकेदार किंवा सदर डाळ कुठे पॅकिंग झाली त्या बद्दल उल्लेख नाही, एक्सपायरी तारीख नाही तसेच डाळ देखील निकृष्ट दर्जाची होती.
तर काल रोजी जिल्हा परिषद ची जीबी मिटिंग होती .त्या मिटिंग मध्ये जि. प.सदस्या वनावल श्रीमती अभिलाशाताई भरत पाटील यांनी स्वतः आज ती मुंगडाळ पिशवी मध्ये सोबत घेऊन जात जि. प. अध्यक्ष साहेब व मुख्य या कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या हातात दिली व डाळ किती निकृष्ट दर्जाची आहे व मुलांना या डाळी मधून जीवनसत्त्वे किती प्रमाणात मिळतील या बद्दल चर्चा करून लक्षात आणुन दिले .तसेच डाळी मधून मिळणारा आहार किती सकस आहे हे देखील सांगितले. म्हणून संबंधित मुंगडाळ पॅकिंग करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करण्यात यावी अशी जी बी मिटिंग मध्ये तक्रार केली. नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवणाऱ्या जिल्हा परिषद कार्यालय आता किमान तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्यांच्या तक्रारीची दखल घेईल काय? व मुजोर ठेकेदारावर कारवाई करेल काय? याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Tags
news
