शिरपुर शहरातील सर्व व्यापारी बांधवांना आवाहन सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचा आदेश रात्री 8 नंतर नियमांचे पालन न झाल्यास कारवाई






शिरपुर  - शहरातील सर्व व्यापारी बंधू आणि भगिनींना आवाहन व सूचना करण्यात येत आहे की मा. जिल्हाधिकारी धुळे व माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंतच सर्व आस्थापना सुरु बठेवण्याचा आदेश निर्गमित केला आहे, तरी रात्री आठ नंतर कोणीही आपले व्यवसाय ,दुकाने सुरू ठेवू नयेत.. तसेच कोणीही विनाकारण रस्त्यावर भटकू नये .असे आढळल्यास पोलीस, महसूल व नगरपालिकेतर्फे कडक कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी असे आवाहन हेमंत पाटील पोलीस निरीक्षक
 शिरपुर शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने