नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रीमंडळाने देशातील 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या लसीकरणाच्या चौथ्या टप्प्यामध्ये 45 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. 45 आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षेखाली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. भारतामध्ये आतापर्यंत 4 कोटी 85 लाख करोनाचे डोस देण्यात आले आहेत. यापैकी 4 कोटींपेक्षा जास्त असे व्यक्ती आहेत ज्यांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर 85 लाख व्यक्तींना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत असं जावडेकरांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आहे.
त्याचप्रमाणे मागील 24 तासांमध्ये विक्रमी 32 लाख 54 हजार जणांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत असंही जावडेकरांनी यांनी माहिती दिली.
पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर 16 फेब्रुवारीपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरु करण्यात आलं. त्यानंतर एक मार्चपासून 45 हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आता लसीकरणाच्या तिसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे.
Tags
news
