महेंद्रसिंह राजपूत शिरपूर
शिरपूर तालुक्यातील पिंप्री गावाची सुकन्या कु. गजनंदिनी गिरासे हिने सन 2020- 2021 चा मिस इंडिया हा मानाचा बहुमान मिळवल्याने राजपूत समाज भूषण या कन्येच्या सत्कार सोहळा व सन्मान शिरपूर शहरात राजपूत समाजातर्फे करण्यात आला. शहरातील स्व इन्द्रसिंह भाऊसाहेब मेमोरियल हॉल कॉलनी येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
शिवाय यावेळी नुकत्याच शिरपूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या या निवडणुकांमध्ये समाजातील नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांच्या देखील सत्कार करण्यात आला .यावेळेस सावळदे गावाचे उपसरपंच सचिन राजपूत ,बोरगाव गावचे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया व जातोडा चे दर्यावसिंग राजपूत यांच्या देखील समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
गजनंदिनी उर्फ गौरी गिरासे ही तालुक्यातील पिंप्री गावाची मूळ रहिवासी असून ते सध्या उल्हासनगर मुंबई येथे स्थायिक आहेत. देवेंद्र सिंग गिरासे यांच्या त्या कन्या असून नवल सिंह ठाणसिंह गिरासे यांच्या त्या नात आहेत. वडिलांच्या मेडिकल स्टोर च्या व्यवसाय असून त्यांनी कु. गौरी गौरी हिस या स्पर्धेसाठी भाग घेण्यास परवानगी देऊन तिचे मनोबल वाढवले आणि एका नवीन क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी तिची साथ दिली म्हणून या यशामध्ये परिवाराच्या देखील फार मोठा परिश्रम आणि मार्गदर्शन आहे.
शिरपूर तालुक्यातील या कन्येने फक्त महाराष्ट्र राज्याची नावे तर शिरपूर तालुक्यात सह खान्देशाचे नाव देखील देशपातळीवर पुढे नेले असून अत्यंत कमी वयात गजनंदिनी गिरासे उर्फ गौरी येणे देशातील मानाच्या मिस इंडिया हा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून विविध राज्यातील 14000 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता कोलकत्ता येथे झालेल्या या स्पर्धेसाठी यापैकी 40 तरुणींची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जीवापाड मेहनत करून व मिस इंडिया बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून गजनंदिनी गिरासे हिने स्पर्धेतील विविध चढ-उतार व आव्हानांना सामोरे जात प्रथम क्रमांक मिळवून मिस इंडिया हा किताब पटकावला असून यातूनच देशभरात नावलौकिक मिळवला आहे.
आपले मनोगत व्यक्त करताना गौरीने सांगितले की माझे कुटुंब माझे आई-वडील यांनी मला भरभरून साथ दिल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत राहिला आणि त्यामुळेच मी हे यश संपादन करू शकले. लहानपणापासूनच मला सेलेब्रिटी किंवा स्टार व्हायचे आहे असं मनात होते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला या स्पर्धेतून पुढे जाण्याची व नाव कमावण्याची संधी प्राप्त झाली. याशिवाय त्यांनी आपल्या मनोगतात तरुण-तरुणींसाठी संदेश दिला आहे की क्षेत्र कोणतेही असो आव्हाने कितीही असो आपण यशाचा पाठलाग केल्यास आपल्याला यश हे निश्चित मिळत असते. भविष्यात आपले शिक्षण पूर्ण करून चित्रपटात काम करण्याची तिची इच्छा आहे.
या कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी मा. नाटूसिंह भाऊ साहेब(माजी नगरपालिका प्रशासकीय अधिकारी) शिरपूर कृषी उत्तम उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र सिंह सिसोदिया यांनी आपले मनोगत व्यक्त करून कुमारी गौरी इस भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरपूर तालुक्याचे आमदार काशिरामजी पावरा उपस्थित होते. त्यांनी देखील या कन्येच्या यशाचे कौतुक करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्यात व कुमारी गौरी चा सन्मान केला.
सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार काशीराम जी पावरा माजी प्रशासकीय अधिकारी नाटूसिंह भाऊसाहेब, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नानासो नरेंद्रसिंह सिसोदिया ,काशीनाथ राऊळ, नगरसेवक चंदन सिंग राजपूत ,नगरसेवक राजू अण्णा गिरासे, नगरसेवक हर्षल राजपूत ,शिवसेनेचे राजू टेलर, नितीन बाबा राजपूत, सचिन राजपूत योगेंद्रसिंग सिसोदिया दर्याव सिंग राजपूत माजी उपसभापती जगत सिंह राजपूत, धनसिंग राजपूत यासह तालुक्यातील समाज बांधव व पिंप्री गावातील व पंचक्रोशीतील समाज बांधव व शिरपूर शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधव यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा जाधव यांनी केले.
Tags
news


