कोरोना योध्दा कर्मचारी परिषद संपन्न , कोरोना योध्दा कर्मचारी परिषद आंदोलनाच्या पवित्रात

प्रतिनिधी राहुलकुमार अवचट,दौंड

कोरोना योद्धा कर्मचारी परिषद, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज दौंड तालुक्यातील चौफुला येथे पुढील कार्याची दिशा ठरविण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते
दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
मार्च महिन्यापासुन सर्वत्र लॉकडाऊन असतानाही आपल्या जिवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या कोरोना योध्दा असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या सेवेतुन कमी करण्यात येत आहे 
या पार्श्वभूमीवर यासाठी परिषदेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
कोरोना काळात आरोग्य विभागात कंत्राटी पदावर काम केलेल्या सर्व कोव्हिड कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे
ज्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्यात आले आहे त्यांना इतरत्र सेवेत सामावून घ्यावे या मागण्या करण्यात आल्या याबाबतीत निर्णय न झाल्यास कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष प्रमोद काटे यांनी दिला कोरोना योध्दांच्या प्रश्नासाठी आवश्यक  प्रयत्न केले जातील असे दौंड पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे यांनी सांगितले 
यावेळी संघटन प्रमुख सौदागर शिंदे,पुणे जिल्हा अध्यक्ष अतुल ठोसर, अभियान प्रमुख मयुरी आरडे, पल्लवी घोरपडे,  दौंड तालुकाध्यक्ष शरद दिवेकर तसेच राज्यातील अनेक सदस्य उपस्थित होते

कोरोना योध्दा कर्मचारी परिषद आंदोलनाच्या पवित्रात

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने