संदीप दादा बेडसे यांची प्रशासनाबाबत असलेली बांधिलकी...!! दोंडाईचा पोलीस स्टेशन दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने रुपये १ लक्ष ची आर्थिक मदत

 


 (श्री.प्रभाकर आडगाळे)            

दोंडाईचा पोलीस स्टेशनला( वेळोवेळी दिलेल्या भेटीदरम्यान श्री संदीप दादा बेडसे यांच्या लक्षात आले की, सर्व पोलीस बांधव जनतेच्या सुरक्षेची तसेच कायदा व व्यवस्थेची जबाबदारी सांभाळत असताना प्रचंड ताणतणावात आपले कर्तव्य व जबाबदारी पार पाडत असतात.परंतु पोलिस स्टेशनमध्ये आपणास ज्या सुविधा असायला हव्यात त्यात प्रचंड प्रमाणात कमतरता दिसून आली. ठाणे अंमलदार कक्षाची ना दुरुस्ती,CCTNS कक्ष, फर्निचर, शुद्ध पेयजल यंत्र तसेच पोलीस स्टेशन येथे कामानिमित्त येणाऱ्या अभ्यागतांसाठी बैठक व्यवस्था अशा अनेक महत्त्वकांक्षी साधनसामुग्रीची कमतरता असल्यामुळे संदीप दादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिंदखेडा तालुक्याच्या वतीने रुपये १ लक्ष ची आर्थिक मदत दोंडाईचा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. ज्ञानेश्वरजी वारे यांच्याकडे सुपूर्त केली.त्याचप्रमाणे दोंडाईचा पोलीस स्टेशनची झालेली दुरावस्था व जिर्ण झालेली इमारत तसेच पोलीसांची निवासस्थाने ही पण अगदी जिर्ण स्वरुपाच्या स्थितीत दिसली.यावर श्री संदीप दादा बेडसे यांनी पोलीसांना लागणाऱ्या भौतिक व मुलभूत सुविधांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वस्त केले. यावेळी माजी आमदार रामकृष्ण तात्या पाटील, दोंडाईचा शहराध्यक्ष अॅड एकनाथ भावसार,कय्युम पठाण,रहीम मन्सुरी,युवक जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे, दादाभाई कापुरे,बापुजी मिस्तरी,काशीनाथ आबा पाटील, निंबा भाऊ पाटील,पिंटु खंडाळे,भोला कापुरे,शिवा खंडाळे आदि उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने