शिंदखेडा तालुक्यातील,तापी नदी काटावर असलेले लहानसे जसाने गावातील श्री केशव धुडकू ईशी, यांचे नातू व श्री दिलीप केशव ईशी यांचा मुलगा, जसाने गावचे माजी सरपंच श्री पंडित केशव ईशी, शशिकांत केशव ईशी , अशोक केशव ईशी, यांचा पुतण्या राकेश दिलीप ईशी सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाले. आज जसाने येथे, जसाने ग्रामस्थ कडून सत्कार करण्यात आला. सी.ए. संदर्भात राकेश ईशी यांनी जसाने गावातील युवकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, युवकांनी शिक्षणात कठोर मेहनत घेणे गरजेचे आहे. त्यांचा विवाह शिरपूर येथिल श्री शिशिकांत अभिमन निकम यांनी कन्या विशाखा यांच्याशी आज दिनांक १४/०२/२०२१ वार रविवार या दिवशी शिरपूर येथे संपन्न होत आहे. कु विशाखा हिने सुद्धा अत्यंत गरिबीतून बी. फार्म पर्यंत चे शिक्षण पूर्ण केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीमती मनीषा बागले यांनी केले. कार्यक्रमाचा आभार जसाने गावचे पोलीस पाटिल श्री गणेश भगवान गिरासे यांनी केले.
Tags
news
