शिरपूर प्रतिनिधी- शिरपूर तालुक्यातील बहुचर्चित व आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाणाऱ्या घोडसगाव ग्रामपंचायतीने मागील सतत 55 वर्षांपासून गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून घेण्याच्या ऐतिहासिक विक्रम केला आहे. यामुळे गावातील एकता अबाधित असून गाव प्रगतीपथावर आहे.
यावर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका देखील घोडसगाव ने आपल्या गावाची ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली होती. सरपंच पदाच्या आरक्षणानंतर आज घोडसगाव गावाची ग्रामपंचायत कार्यकारणी जाहीर करण्यात आली यात उषाबाई हुकुमचंद गुजर सरपंच', पितांबर हिरामण धनगर उपसरपंच, प्रताप चिंतामण पाटील, अन्नपूर्णाबाई संतोष पाटील ,रेखाबाई निंबा कोळी, महादू एका भिल, ताराबाई बुधा भिल यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही .बी. पाटील, तलाठी एन .एस .पटेल, ग्रामसेवक डी .ए. कुवर उपस्थित होते.
यासाठी मार्गदर्शक म्हणून खरेदी-विक्री संघाचे सभापती प्रकाश भोम पाटील पोलीस पाटील अरुण श्रीराम पाटील ,माजी सरपंच सुकलाल महादू पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन मोहन धोंडू कोळी मा.विकास सोसायटीचे चेअरमन दशरत जगन्नाथ धनगर इ उपस्थित होते .सदर कार्यक्रमासाठी गावातील दरबार प्रभाकर पाटील, रमण काशिनाथ पाटील, युवराज दगा कोळी, अरुण भागवत पाटील ,भगवान बापू पाटील ,माणिक बाबुराव पाटील ,मोतीलाल धोंडू पाटील इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते
Tags
news