प्रेरणा फाउंडेशन तर्फे प्रेरणा युट्युब प्रॉडक्शन आयोजित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑनलाईन राज्यस्तरीय महाराष्ट्र लिटल स्टार डान्स शो स्पर्धेचा निकाल जाहीर





प्रेरणा  फाउंडेशन ठाणे  महाराष्ट्र राज्य रजि. 564/एफ 38784/बदलापूर/ठाणे /महाराष्ट्र. सर्वांना एकत्रित आणून एक व्यासपीठ मिळावे या उद्देशाने प्रेरणा फाउंडेशन तर्फे प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ अंतर्गत आयोजित 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ऑनलाईन राज्यस्तरीय महाराष्ट्र लिटल स्टार डान्स शो  स्पर्धा चे आयोजन केले होते. 
 प्रत्येकाच्या अंगामध्ये एक कला असते.  या लॉकडाऊन काळात सर्वांना प्रोत्सहन मिळावे एका हक्काचे व्यासपीठ मिळावे या करिता या स्पर्धेचे आयोजन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका  अध्यक्षा दिप्ती (प्रेरणा) गांवकर यांनी दि. 26 जाने 2021 प्रजासत्ताक दिनानिमित्त रोजी केले होते.  या ऑनलाईन महाराष्ट्र लिटल स्टार डान्स शो स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व बाल कलाकारांनी भाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. खूप छान छान डान्स टॅलेंट सादर केले. 
  या अश्या राज्यस्तरीय ऑनलाईन महाराष्ट्र लिटल स्टार डान्स शो स्पर्धेचा निकाल हा ऑनलाईन पद्धतीने प्रेरणा यू ट्यूब  प्रोडक्शन महाराष्ट्र चॅनल द्वारे आज दि.  27 फेब्रुवारी  रोजी जाहीर करण्यात आला.
    स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप🎖️*
**स्पर्धेतील बक्षिसांचे स्वरूप*
 *1)40स्पर्धांकापैकी ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ ला सर्वात अगोदर 5000 व्यूज (लाईक) मिळतील  त्याला पहिले बक्षिस दिले आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्रक .*
*2)तसेच ज्या स्पर्धकांच्या व्हिडिओ ला 4000 व्यूज (लाईक) मिळतील त्याला दुसरे बक्षीस भेटवस्तू व प्रमाणपत्रक स्वरूपात दिले.*
*3)ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ ला 3000 व्यूज (लाईक) मिळतील त्याला तिसरे बक्षिस दिल जाईल भेटवस्तू.व ऑनलाईन प्रमाणपत्रक   स्वरूपात दिले.*
*4)ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ ला 2500 व्यूज (लाईक) मिळतील त्याला चौथे बक्षिस दिल जाईल भेटवस्तू व प्रमाणपत्रक दिले.*
*5)ज्या स्पर्धकाच्या व्हिडिओ ला 2000 व्यूज (लाईक) मिळतील त्याला भेटवस्तू  बक्षीस व प्रमाणपत्रक दिले.*
*सर्व स्पर्धकांना ऑनलाईन प्रमाणपत्र देण्यात आले.*
*यूट्यूब व्युज (लाईक) कालावधी:-.30 दिवस* *26 जानेवारी  ते 27 फेब्रुवारी असा होता, दि. 27 फेब्रुवारी  रोजी निकाल जाहीर करण्यात आला  महाराष्ट्र लिटल स्टार  शो स्पर्धेचा महाविजेता हा कु. साई संजय ससाणे या बाल कलाकराने 5000 व्युज घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय विजेता कु. काव्य प्रसाद फर्डे, तर पाचवे विजेते कु. आदित्य गणेश जाधव व कु. श्रुतिका कदम ठरले. या कार्यक्रमासाठी प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापक प्रेरणा गावकर यांना उपखजिनदार दिव्या गांवकर व सचिव वैभव कुलकर्णी याचे प्रमाणपत्रक बनवण्यास सर्वोउत्कृष्ट सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने